ड्रग्स प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

जाणून घ्या सविस्तर..

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला राघिनीचा मित्र रवीशंकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान त्याने राघिनीचं नाव घेतलं. त्यामुळे तिला देखील अटक करण्यात आली. आता रागिनीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

नुकताच एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि अन्य आरोपींना ड्रग्स प्रकरणात कोर्टाने न्यायालयीन कोठडीत वाढ केल्यानंतर पराप्पना अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात आणले गेले असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे प्रकरण काय आहे?

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. यापैकी एक नाव प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिचं देखील आहे. परिणामी क्राईम ब्रांचने तिला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. शुक्रवारी सकाळी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु चौकशीसाठी ती गैरहजर राहिली. शिवाय तिने सोमवारपर्यंत वेळ देखील मागितला होता. दरम्यान क्राईम ब्रांचने तिचा मित्र रविशंकर याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर पोलिसांनी राघिनीचा घरी छापा टाकला व तिला अटक केली. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे. तसंच या प्रकरणाचे सुत्रधार विदेशात असल्याचा संशय त्यांना आहे. या ड्रग्स गँगमध्ये रागिनीची भूमिका काय आहे? याचा तपास आता केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor ragini dwivedi court extended their judicial custody avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!