“पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर…”, राजकुमार रावने दोन महिन्यानंतर केला वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा

राजकुमार राव अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याची प्रेयसी पत्रलेखासोबत विवाहबंधनात अडकला.

“पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर…”, राजकुमार रावने दोन महिन्यानंतर केला वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. राजकुमार राव अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याची प्रेयसी पत्रलेखासोबत विवाहबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यासोबत ते दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत राजकुमार रावने त्याच्या लग्नानंतरच्या आयुष्यातील मजेशीर किस्से सांगितले आहेत.

राजकुमार रावने नुकतंच ई टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजकुमारने लग्नानंतर आयुष्यातील मजेशीर किस्से सांगितले आहे. यावेळी तो म्हणाला की, “पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर मला खूप छान वाटत आहे. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझे प्रेम, माझे कुटुंब आणि माझे सर्व काही आहे.”

यावेळी राजकुमार रावला ‘इतकी वर्षे डेटींग केल्यानंतर लग्न का केले?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाली, “आम्ही लिव्ह इन मध्ये राहत असताना फार कमी दिवस एकत्र असायचो. शूटींगमुळे मी अनेकदा बाहेर असायचो आणि तीसुद्धा तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. पण लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे आम्ही एकत्र राहिलो. आम्हाला एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यावेळी आमच्या हे लक्षात आले की आपण आपले उर्वरित आयुष्य एकत्र घालवू शकतो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

“मला आता पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. मी आणि पत्रलेखा सध्या पती-पत्नी बनण्याचा सराव करत आहोत. मला आता तिला बायको म्हणायला आवडते. मी एकटा असताना अनेकदा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचो, पाणीपुरी खायचो. आताही जेव्हा पत्रलेखा शहराबाहेर असते तेव्ही मी हे सर्व करतो”, असेही राजकुमारने सांगितले.

यापुढे राजकुमार म्हणाला की, “११ वर्षे एकत्र राहूनही आम्ही अद्याप तसेच आहोत. आमच्यात काहीही बदल झालेला नाही. अनेक नात्यात पहिल्या दुसऱ्या वर्षातच बोलण्याची इच्छा कमी होते. पण आमच्या बाबतीत हे सर्वकाही उलट झाले आहे. आमचा एकमेकांशी बोलण्याचा वेळ वाढत आहे. त्यामुळे आमच्यात काहीही कमी झालेले नाही.”

“जर हे असंच चालू राहिले तर…”, राखी सावंतने पती रितेशला दिली अप्रत्यक्षरित्या धमकी

राजकुमार आणि पत्रलेखा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ते लग्न बंधनात अडकले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor rajkummar rao opens up about marriage says i love calling patralekhaa wife nrp

Next Story
VIDEO : पाकिस्तानातही पोहोचली ‘पुष्पा’ची जादू..! स्टार क्रिकेटरनं Srivalli गाण्यावर केला डान्स
फोटो गॅलरी