scorecardresearch

Premium

जगप्रसिद्ध गायक एकॉन, रणवीरची एफ-१ कार रेसिंग स्पर्धेत भेट; दोघांनी गायलं शाहरुख खानचं ‘हे’ खास गाणं

बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या उत्साहामुळे ओळखला जातो.

ranveer singh and akon
रणवीर सिंग आणि गायक एकॉन (फोटो- ट्विटर)

बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या उत्साहामुळे ओळखला जातो. अभियनसह, सूत्रसंचालन आणि इतर मनोरंजनपर कार्यक्रमातील त्याचे सादरीकर उत्साहाने ओतप्रोत असतो. दरम्यान, रणवीर सिंग सध्या एफ-१ कार रेसिंग स्पर्धा पाहण्यासाठी थेट अबुधाबीमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे अबुधाबीमध्येही त्याने पुन्हा एकदा आपल्या उत्साहाचे दर्शन घडवले आहे. रणवीरने जगप्रसिद्ध गायक एकॉनसोबत ( Akon) गाणं गायलं आहे.

हेही वाचा >>> ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी; कमेंट करत विकी कौशल म्हणाला, “मित्रा…”

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
Kapil Sharma Huma Qureshi १
कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला ईडीकडून समन्स, श्रद्धा-टायगरसह १५ कलाकार रडारवर? जाणून घ्या नेमकं प्रकरण
priyanka chopra nose surgery
“ती इंडस्ट्री सोडून जाणार होती”, ‘गदर’च्या दिग्दर्शकाचा प्रियांका चोप्राबद्दल मोठा खुलासा; म्हणाले, “नाकाच्या सर्जरीनंतर…”
actor Vijay Antony daughter Meera dies by suicide
प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

रणवीर सिंगने एकॉनला शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या रा-वन या चित्रटातील ‘छम्मकछल्लो’ हे हिंदी गाणं गायला लावलं आहे. एकॉन गात असताना रणवीर सिंगदेखील हेच गाणे गुणगुणताना दिसतोय. विशेष म्हणजे गाणे गाताना दोघेही आनंदात नाचत आहेत. रणवीर सिंगचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा >>> कॉन्सर्टनंतर प्रसिद्ध गायिकेबरोबर घडला धक्कादायक प्रकार; पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, रणवीर सिंग सध्या अनेक चत्रपटांवर काम करत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर हे दिग्गज कलाकार असतील. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटातही रणवीर सिंग दिसेल. रणवीरसोबत आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor ranveer singh meets singer chammak challo song in abu dhabi prd

First published on: 21-11-2022 at 16:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×