हॉलिवूड अभिनेता रयान ग्रँथमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या २४ वर्षीय अभिनेत्याने पियानो वाजवत असताना आईच्या डोक्यात गोळी झाडली होती, विशेष म्हणजे नंतर तो कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रुडो यांच्यावरही गोळी झाडण्याच्या तयारीत होता. रयानने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘रिव्हरडेल’ आणि ‘डायरी ऑफ अ विम्पी किड’ हे त्याचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत.

“…त्यामुळे मला बिग बॉसमध्ये जावं लागलं”, पत्नीच्या निधनानंतर इंडस्ट्रीपासून दुरावलेल्या अभिनेत्याचा खुलासा

रयान ग्रँथमने मार्च २०२० मध्ये त्याच्या आईची हत्या केली होती. त्याची आई पियानो वाजवताना त्याने गोळी झाडली होती. सीबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, रयान ग्रॅंथमला दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याच्यावर सेकंड-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला केवळ शिक्षाच नाही तर आजीवन फायर अलार्म वापरण्यावरही बंदी घातली आहे. त्याला २० सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात आली. रयानला ही शिक्षा ब्रिटिश कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुनावली.

“मी १०० कोटींच्या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं, पण नंतर काम मिळालंच नाही”; अभिनेत्याने व्यक्त केली खंत

रयानला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची हत्या करायची होती, असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. त्याच्यावर सुरुवातीला फर्स्ट-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. नंतर, त्याला सेकंड-डिग्री हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. दरम्यान, रयानच्या बहिणीनेही न्यायालयात त्यायाविरोधात साक्ष दिली आणि तिचा भाऊ धोकादायक माणूस आहे, असं तिने म्हटलं होतं. सर्व साक्ष आणि प्रकरणाचा पूर्ण तपास झाल्यानंतर आईच्या हत्येप्रकरणी रयानला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.