Tiger 3 Release Date : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘टायगर-३,’ विशेष व्हिडीओ पोस्ट करत सलमान खानने जाहीर केली तारीख

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या जोडीला चांगलीच पसंदी मिळते.

Tiger 3 Release Date : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘टायगर-३,’ विशेष व्हिडीओ पोस्ट करत सलमान खानने जाहीर केली तारीख
सलमान खान आणि कतरिना कैफ (संग्रहित फोटो)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या जोडीला चांगलीच पसंदी मिळते. सलमान-कतरिना जोडीच्या एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. दरम्यान, या जोडीचा टायगर-३ हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सलनाम खानने एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा >>> ‘आमचे चित्रपट तुमच्या सरकारपेक्षा…’ जेव्हा फिरोझ खान यांनी पाकिस्तानला सुनावले होते

सलमान खान आणि कतरिना यांच्या या चित्रपटाची घोषणा जुन महिन्यातच करण्यात आली होती. हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सलमान खानने एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दल अधिका माहिती दिली आहे. यामध्ये त्याने हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलुगु या भाषांत प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच सलमान खानच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >>> ‘फॉरेस्ट गंप’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’मधल्या ‘या’ दृश्यांमधील साम्य ठाऊक आहे का?

याआधी जुन महिन्यात यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये कतरिना अँग्री गर्लच्या रुपात दिसत होती. राग, घामाने भिजलेलं अंग, मोकळे केस अशा ढंगात कतरिनाला दाखवण्यात आले होते. याच कारणामुळे टायगर-३ चित्रपटाचे कथानक काय असेल. यामध्ये कतरिनाची काय भूमिका असेल, असा प्रश्न पडलेला असताना सलमानने आणखी एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

हेही वाचा >>> ‘या’ अभिनेत्रीमुळे झालंय दिशा- टायगरचं ब्रेकअप? अभिनेत्याशी अफेअरच्या चर्चांना उधाण

दरम्यान, टायगर-३ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू या भाषांत प्रदर्शित केला जाणार असून यामध्ये सलमान-कतरिना यांच्याव्यतिरिक्त इमरान हाशमी हा दिग्गज अभिनेतादेखील झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आमचे चित्रपट तुमच्या सरकारपेक्षा…’ जेव्हा फिरोझ खान यांनी पाकिस्तानला सुनावले होते
फोटो गॅलरी