मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहूगुणसंपन्न अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. अभिनयात त्याने आपली छाप पडलेली आहेच पण त्यासोबतच काव्यलेखन करतही त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय राहत त्याचा कविता तो प्रेक्षकांना ऐकवात असतो. आता नुकताच त्याने त्याच्या एका नवीन कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असे, ज्यात त्याने पालकांना एक मोलाचा संदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “तुझे प्रयत्न कौतुकास्पद…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मानले अक्षय कुमारचे आभार

सध्या संकर्षणच्या कवितेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. खूप दिवसांनी कविता करतोय असं म्हणतच त्याने संवाद साधला आहे. बऱ्याच दिवसांनी त्याने कविता ऐकवण्यासाठी वेळ काढला आहे. कधी कधी सुचत नाही, कधी वेळ मिळत नाही तर कधी लिहावं असं वाटत नाही असं तो म्हणाला. मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना मोठं होताना बाबा म्हणून मला काय वाटतं ही त्याची कविता. ही कविता म्हणजे जगातील प्रत्येक बाबाच्या मनातील भावना आहेत असंही त्याने व्हिडीओत सांगितलं.

‘मोठं व्हायचं तर व्हा ना.. इतकी घाई काय’ असे या कवितेचे नाव आहे. या कवितेतून तो असं म्हणतोय, सध्याची मुलं इतकी लवकर मोठी आहेत आहेत की तो प्रवास पाहणं पालकांच्या हातातून निसटून जात आहे. दात येणं, पहिलं पाऊल टाकणं, बोबणं बोलणं हे टप्पे पार करण्याचा मुलांचा वेग पाहून पालकांना असं वाटतं की मोठं व्हायची इतकी घाई काय आहे. संकर्षणची ही कविता नेटकऱ्यांना खूप आवडलेली असून कमेंट्स करत नेटकरी या कवितेला दाद देत आहेत. त्यासोबतच संकर्षणच्या या भावनांशी आम्ही सहमत आहोत असेही अनेकजण त्याला सांगत आहेत.

आणखी वाचा : सुबोध भावेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

गेल्या वर्षभरापासून संकर्षण मालिका आणि नाटक यामध्ये खूपच बिझी होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याची समीर ही भूमिका खूपच गाजली. अलीकडेच या मालिकेतील त्याचा शेवटचा सीन त्याने शूट केला. मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यामुळे कविता करायला वेळ मिळत नसल्याची प्रांजळ कबुलीही संकर्षणने दिली. गेल्या वर्षभरात संकर्षणने नवी कविताच केली नव्हती. आता मात्र त्याने ही उणीव भरून काढत एक कविता चाहत्यांना ऐकवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sankarshan karhade expressed his feelings through poetry rnv
First published on: 12-09-2022 at 10:49 IST