जेव्हा शाहरुख आणि राखी सावंत रोमॅन्टिक डान्स करतात…

राखीने शाहरुखबरोबर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही करत असते. चर्चेत राहण्यासाठी नेमकी काय करावं लागतं हे तिला चांगलंच माहित आहे. कधी कोणते तरी वक्तव्य करुन तर कधी प्रसिद्धी मिळवण्याकरता कोणता तरी स्टंट करायचा हे राखी सावंतच्या अंगवळणी पडले आहे. स्वातंत्र्यदिना निमित्त कॅलिफोर्निया झालेल्या एका कार्यक्रमात ती मोदींचे फोटो चिकटवलेला ड्रेस घालून गेलेली. या तिच्या ड्रेसमुळे तिला भलतीच प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या आगळ्या वेगळ्या स्टंटबाजीबरोबरच ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. इथे ती तिची छायाचित्र आणि कार्यक्रमाचे फोटो सतत पोस्ट करत असते.
काही दिवसांपूर्वी राखीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. यात ती शाहरुख खानबरोबर नृत्य करताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडिओ खूप हास्यास्पद आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने राखीसोबत ताल धरण्याचा प्रयत्न केला आहे. शाहरुख नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये चार्मिंग दिसत आहे. तर राखीने तिचा नेहमीचा बाज मात्र सोडलेला नाही.  हा व्हिडिओ कोणत्या कार्यक्रमामध्ये काढला याबद्दल अधिक माहिती हाती आलेली नसली तरीही या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे. राखीने मिळालेल्या संधीचा फायदा मात्र नक्कीच घेतला. या व्हिडिओमध्ये राखीने परिधान केलेला ड्रेस खूप भडक आहे. तर किंग खान मात्र त्याला साजेशा पेहरावात आहे. राखी या व्हिडिओमध्ये शाहरुख खानबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. पण हे दोघे नृत्य करत आहेत ते कोणत्याही गाण्यावर नाही तर ५ ६ ७ ८ च्या ठेक्यावर.

Love you srk😘

A video posted by Rakhi sawant (@rakhisawant151) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor shahrukh khan danced with rakhi sawant

ताज्या बातम्या