‘झी स्टुडिओज’ची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे जाहीर झाल्यानंतर या चित्रपटाची उत्कंठा वाढवणारे आणखी एक पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. मराठी झ्र् हिंदी चित्रपट आणि वेबमालिकांमध्ये विविधांगी  भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हर हर महादेव’ ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळय़ांचा महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असो त्याला सळो की पळो करून सोडण्यासाठीची ऊर्जा निर्माण करणारी, मावळय़ांना नवी उमेद देणारी शिवगर्जना म्हणजे हर हर महादेव. हाच हर हर महादेवचा महामंत्र जपत बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडिखड लढवली आणि आपल्या प्राणांची आहुती देत घोडिखड पावन केली. बाजीप्रभूंच्या याच लढवय्या करारी बाण्याची गाथा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे. 

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाले, ‘‘आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांच्या, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळय़ांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलेलो आहोत. बाजीप्रभूंच्या पावनिखडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्त्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रति त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम. घोडिखडीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सर्वासाठी कायम प्रेरणादायी असाच आहे. अशा बाजीप्रभूंची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो. ही गोष्ट तेवढय़ाच प्रखरपणे आणि सच्चेपणाने प्रेक्षकांसमोर येण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे  आणि संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच भावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.’’

या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलताना दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले, ‘‘एक लेखक – दिग्दर्शक म्हणून अनेक विषय, गोष्टी तुम्हाला कायमच खुणावत असतात आणि आव्हानही देत असतात. माझ्याबाबतीत ही गोष्ट होती छत्रपती शिवरायांची. महाराजांच्या आयुष्यावर त्यांच्या लौकिकाला साजेसा असा भव्य चित्रपट निर्माण करण्याची आणि त्यांच्या शौर्याची गाथा तेवढय़ाच रंजक पद्धतीने सांगण्याची मनात कायम इच्छा होती. या इच्छेतून आणि महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच हर हर महादेव चित्रपट करायचं ठरवलं. छत्रपती शिवरायांचा त्यांच्या मावळय़ांवर असलेला विश्वास आणि मावळय़ांची महाराजांप्रति असलेली निष्ठा ही आपल्याला कायमच भावते. हर हर महादेवह्णची कथासुद्धा महाराज आणि बाजीप्रभू यांच्या या दृढ नात्यावर आधारलेली आहे. ही केवळ एक शौर्यगाथा नाही तर त्याला या नात्याची एक भावनिक किनारही आहे. सुदैवाने मला महाराजांच्या भूमिकेसाठी सुबोध भावे आणि बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी शरद केळकर यांच्यासारखे बहुगुणी कलाकार लाभले. या दोघांनीही त्यांना मिळालेल्या या भूमिकांचं सोनं केलेलं आहे’’.  याशिवाय, झी स्टुडिओजसारखी नावाजलेली निर्मितीसंस्था आणि सुनील फडतरे यांची श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स ही निर्मितीसंस्था पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ज्यामुळे निर्मितीमूल्यांच्या बाबतीत हा चित्रपट एका वेगळय़ा उंचीवर गेला आहे, असेही त्यांनी सांगितले.