मराठी अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुदद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसतात. त्यांची वक्तव्यं अनेकदा चर्चेत असतात पण याबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Photos : “या वयातही अगदी तरुण दिसता” चक्क शरद पोंक्षे यांनी केलं खास फोटोशूट, साधेपणाने वेधलं चाहत्यांचं लक्ष

शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमादरम्यानचा त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्याबाबत बोलताना दिसत आहेत. तासाभरातच अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच शरद पोंक्षे यांचं बोलणं ऐकून अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? याबाबत शरद पोंक्षे म्हणतात, “एक चित्र बघत आपली पिढी मोठी झाली. ते चित्र म्हणजे एक लंगोट नेसलेला, दाढी वाढलेली, खडकावर रुबाबामध्ये राजासारखा बसलेला व्यक्ती आणि त्यांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत. छत्रपती पदावर बसलेले आहेत, राज्याभिषेक झालेला आहे, स्वराज्याची निर्मिती देखील झाली आहे, राजा म्हणून राज्याभिषेक संपूर्ण देशाने मान्य केला आहे आणि ते विनम्रपणे मान खाली घालून शांतपणे बाजूला उभे आहेत.”

आणखी वाचा – Photos : शरद पोंक्षे यांचा मुलगा कोण आहे माहितेय का? ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही केलंय काम

“दाढी वाढलेले, खडकावर बसलेले सन्यासी म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दोघंही महान का? कारण खरा राजा तोच असतो ज्यांना आपल्या भूमीतील संतांचा आदर कसा करायचा हे कळतं.” शरद पोंक्षे यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तुम्ही उत्तम माहिती दिली असं कमेंट्सच्या माध्यमातून म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad ponkshe talk about relation between chatrapati shivaji maharaj and samarth ramdas swami watch video kmd
First published on: 12-09-2022 at 11:10 IST