महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २२ जून रोजी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. मुख्यमंत्र्यांचे हे भाषण ऐकून अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘बिग बॉस’ फेम अभिनेता शिव ठाकरेच्या आईला तर मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून अश्रू अनावर झाले.
शिवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकताना दिसत आहे. पण हे भाषण ऐकत असताना त्यांना अश्रू अनावर झालं असल्याचं दिसत आहे. शिवने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “खऱ्या माणसांसाठी खरी माणसं भावूक होतात. जय महाराष्ट्र.”
शिवचीच आई नव्हे तर कित्येक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून भावूक झाले होते. तसेच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक प्रतिक्रियाही दिल्या. शिव सोशल मीडियाद्वारे नेहमीच व्यक्त होताना दिसतो. त्याने आताही आपल्या आईचा व्हिडीओ शेअर चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिवच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्लिक केल्यास तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.

आणखी वाचा – “काय मग बघताय ना ‘रानबाजार’”; राजकीय परिस्थिती पाहता तेजस्विनीने शेअर केला ‘रानबाजार’चा ‘तो’ सीन
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं. मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. कलाविश्वातील काही मंडळींनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. तर काहींनी सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत संताप देखील व्यक्त केला.