श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेत श्रेयस तळपदे अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत झळकणार आहे.

shreyas-talpade-new-serial
(Photo-instagram@shreyastalpade27)
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारात प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय.

झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेचा पहिला प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलाय. अगदी काही तासातचं या प्रोमोला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. या प्रोमोत हॉटेल मधील एका टेबलावर एक चिमुकली मुलगी प्रश्न विचारताना दिसतेय. ही चिमुकली श्रेयस तळपदेला काही प्रश्न विचारतेय. तर श्रेयसही तिच्या प्रश्नांना उत्तर देत आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत झळकणार आहे. प्रार्थनादेखील बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पहा व्हिडीओ: जेव्हा वैभवी स्वराजच्या गाडीवर कोसळली; ‘असा’ शूट झाला ‘सांग तू आहेस का’ मालिकेचा स्टंट सीन

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. झी मराठीच्या इन्स्ट्राग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर अभिनेता अंकुश चौधरीने देखील कमेंट करत श्रेयसला शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं या चिमुकलीचंही कौतुक केलंय. “वाह वाह श्रेयस. अभिनंदन मित्रा. आणि ती मुलगी किती गोड आहे. कमाल..” अशी कमेंट अंकुश चौधरीने केली आहे.

‘आभाळमाया’, ‘दामिनी’ ‘अवांतिका’ मराठी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून श्रेयसने सुरुवातीच्या काळातच आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर हिंदी मालिकांसोबतच तो ‘सावरखेड’, ‘आईशप्पथ’ या मराठी सिनेमांमधून झळकला. 2005 सालामध्ये आलेल्या ‘इक्बाल’ सिनेमातून श्रेयसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor shreyas talpade comeback on small screen play lead role in zee marathi new serial majhi tujhi reshimgath with prarthana behare kpw