‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटासाठी दिला आवाज

नुकताच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

allu arjun, pushpa, pushpa released date, shreyas talpade,
हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा द राइज’ सध्या चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला मराठमोळ्या कलाकाराने आवाज दिला आहे.

पॅन इंडियाचा हा पहिला प्रोजेक्ट आहे जो दाक्षिणात्य भाषांशिवाय हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या हिंदी ट्रेलरला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘भारतातील अतिशय लोकप्रिय आणि स्टायलिश अभिनेत्याला आवाज देताना मला प्रचंड आनंद झाला आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा आता हिंदीमध्ये’ या आशयाची पोस्ट श्रेयसने केली आहे.
आणखी वाचा : ‘निदान सॉरी म्हणायला तरी…’, हिंदी अभिनेत्रीमुळे ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार त्रस्त

सुपरस्टार अल्लु अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज होणारा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाती पात्र आणि कथा पूर्ण करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्याने हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज करणार असल्याचे, निर्माते नवीन येर्नेनी यांनी सांगितले होते. आता चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor shreyas talpade give voiceover in allu arjun puspa the rise hindi movie avb