झुकेगा नही साला…!, अभिनेता श्रेयस तळपदे करणार 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री | actor shreyas talpade may enter into Bigg Boss Marathi Season 4 new promo viral nrp 97 | Loksatta

झुकेगा नही साला…!, अभिनेता श्रेयस तळपदे करणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री

श्रेयस तळपदेने इतर सदस्यांप्रमाणे गळ्यात माईकही घातला आहे.

झुकेगा नही साला…!, अभिनेता श्रेयस तळपदे करणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. बिग बॉसचा हा शो सर्वत्र लोकप्रिय आहे. यंदाचं बिग बॉसचे पर्व हे ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. बिग बॉस मराठी हा शो सुरु होऊन आठवडाही उलटलेला नाही. पण या शोमधील सदस्यांमध्ये गटबाजी आणि वाद सुरु झाले आहेत. त्यातच आता बिग बॉसच्या घरात एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे.

‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव नुकतंच समोर आली आहेत. पहिल्या दिवसांपासून बिग बॉसमध्ये गटबाजी हा प्रकार सुरु झाला आहे. अनेक सदस्यांमध्ये कडाक्याचे भांडण होताना दिसत आहे. यंदा घरात चाळ संस्कृती पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या १६ सदस्य आहेत. त्यातच बिग बॉसच्या घरात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सहभागी होणार आहे. हा अभिनेता दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेता श्रेयस तळपदे आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी 

नुकतंच कलर्स मराठी वाहिनीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत बिग बॉस मराठीच्या घरात एक नवी एंट्री होताना दिसत आहे. यावेळी एंट्री घेताना श्रेयस तळपदे म्हणतो की, “या घराने आतापर्यंत बऱ्याच एंट्री बघितल्या असतील, आता या घरात होतेय माझीही धमाकेदार एन्ट्री… बघत राहा बिग बॉस मराठी…! झुकेगा नही साला…!”

आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले

यावेळी श्रेयस तळपदेने इतर सदस्यांप्रमाणे गळ्यात माईकही घातला आहे. त्यामुळे श्रेयस तळपदे हा खरंच बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. हा प्रोमो पाहिल्यावर अनेक नेटकरी चकित झालेत आहे. अनेकांनी श्रेयस तळपदे बिग बॉस मध्ये सहभागी होणार असेल तर घराचा चेहरा बदलेल असं म्हटले आहे. तर काहींनी तो त्याचा आगामी चित्रपट आपडी थापडीच्या प्रमोशनसाठी आलाय असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
करीना कपूर आगामी चित्रपटात दिसणार ‘या’ विशेष भूमिकेत, लंडनमध्ये होणार चित्रीकरण

संबंधित बातम्या

‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर
“मराठी सीरियलचा पॅटर्न आता आऊट ऑफ द बॉक्स होत चाललाय…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत
मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम