VIDEO : घटस्फोटाच्या निव्वळ अफवा?, सिद्धार्थने शेअर केलेल्या लेकीच्या डान्स व्हिडीओमध्ये दिसली पत्नी तृप्ती

अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या लेकीचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

siddharth jadhav siddharth jadhav photo
अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या लेकीचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी तृप्तीपासून तो लवकर विभक्त होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चांबाबत सिद्धार्थ-तृप्तीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. मुलगी स्वराचा वाढदिवस सिद्धार्थ-तृप्तीने एकत्र साजरा केला. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या फोटोमध्ये तृप्ती देखील त्याच्याबरोबर दिसत आहे. आता सिद्धार्थने आपली मुलगी ईराचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तृप्ती देखील दिसत आहे.

आणखी वाचा – Photos : शरद पोंक्षे यांचा मुलगा कोण आहे माहितेय का? ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही केलंय काम

सिद्धार्थचा ‘तमाशा LIVE’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याच चित्रपटासाठी त्याने एक रॅप साँग गायलं आहे. त्याच्या याच रॅप साँगवर ईरा डान्स करताना दिसत आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये टिव्हीवर ‘तमाशा LIVE’मधलं गाणं दिसत आहे. हे गाणं पाहून सिद्धार्थची लेक ईरा डान्स करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

“गायक सिद्धार्थ जाधवला ईरा एण्जॉय करत आहे. बापलेकीची मज्जा.” असं सिद्धार्थने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. सिद्धार्थचं त्याच्या मुलींवर प्रचंड प्रेम आहे. आपल्या दोन्ही मुलींबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. तसेच सिद्धार्थ आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये मुलींबरोबर एकत्रित वेळ घालवतो.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

सिद्धार्थ सध्या ‘तमाशा LIVE’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिवाय त्याचा ‘दे धक्का २’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘तमाशा LIVE’साठी तर त्याने चक्क गाणं गायलं आहे. म्हणजेच त्याचा हा नवा प्रयत्न आहे. त्याची प्रत्येक भूमिका आणि चित्रपट पाहण्यासाठी खरंच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor siddharth jadhav share daughter ira dance video on his tamasha live movie rap song video viral on social media kmd

Next Story
राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी