scorecardresearch

सुबोध भावेने पत्नीबरोबर ट्रेंडिंग म्युझिकवर धरला ताल; व्हिडीओ व्हायरल

सुबोध भावे सोशल मीडियावर सक्रीय असतो, नुकताच तो आपल्या कुटुंबाबरोबर राजस्थानला फिरण्यासाठी गेला आहे

सुबोध भावेने पत्नीबरोबर ट्रेंडिंग म्युझिकवर धरला ताल; व्हिडीओ व्हायरल
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याने आणि त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर ट्रेंडींग असलेल्या एका म्युझिकवर ताल धरला आहे.

सुबोध भावे आणि त्याचे कुटुंबिय सध्या राजस्थानला फिरण्यासाठी गेले असताना त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका फ्रेमवर लिहले आहे “सुट्टीला आलोय फिरायला” तर “दुसऱ्या फ्रेमवर सुट्टीला आलोय आराम करूया” असा कॅप्शन लिहला आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘सुट्टी कशासाठी? असा कॅप्शनदेखील दिला आहे. त्यांचा मुलगा कान्हाने हा व्हिडीओ शूट केला आहे.

सुबोध अभिनेता दिग्दर्शक म्हणून ओळखला जातोच मात्र त्याची पत्नी मंजिरी भावेदेखील निर्माती आहे. या दोघांची ‘कान्हा मॅजिक’ नावाची निर्मिती संस्था आहे. सुबोध नुकताच’ हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता आता त्याचा ‘वाळवी’ चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 19:48 IST

संबंधित बातम्या