‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. समीर चौगुले याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतंच अभिनेता सुबोध भावे यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने समीर चौगुलेचा अभिमान वाटतो असे सांगितले आहे.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

आणखी वाचा : समीर चौगुलेला चाहत्याने दिलं अनोखं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

सुबोध भावेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एका रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. या रांगोळीत एका बाजूला समीर चौगुले आणि दुसऱ्या बाजूला विनोदवीर चार्ली चॅप्लिन दिसत आहे. मदन कावळे या कलाकाराने ही रांगोळी काढली आहे. यात त्याने समीर चौगुले यांना चार्ली चॅप्लिनचा दर्जा दिला आहे. यासोबत सुबोध भावेने त्याला खास कॅप्शनही दिले आहे.

समीर मित्रा ही रांगोळी बघून खूप अभिमान वाटला तुझा. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे. खूप प्रेम, असे सुबोध भावे कॅप्शन देताना म्हणाला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी समीर चौगुलेने याच रांगोळीचा फोटो शेअर केला होता. ही रांगोळी पाहिल्यानंतर समीर चौगुले भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान अभिनेते समीर चौगुले हे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. याच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.