‘हॅम्लेट’च्या भेटी ‘नटसम्राट’ आला!

प्रेक्षागृहात बसलेल्या लागू यांना पाहून मी गहिवरून गेलो, असे सुमीतने सांगितले.

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांना ‘हॅम्लेट’ सुमीत राघवन याने नमस्कार केला. दीपा लागू या वेळी उपस्थित होत्या.

पुणे : तुकोबाचे भेटी शेक्सपिअर आला

तो झाला सोहळा दुकानात!

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेची आठवण करून देणारी घटना नुकतीच घडली. ‘हॅम्लेट’च्या भेटी ‘नटसम्राट’ आला; तो झाला सोहळा व्हीआयपी खोलीत, असे दृश्य मोजक्या भाग्यवंतांना अनुभवता आले. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट डॉ. श्रीराम लागू आणि हॅम्लेट साकारणारा सुमीत राघवन या दोन शोकात्म नायकांची उराउरी भेट झाली नसली, तरी सुमीत राघवन याने डॉ. लागू यांना नमस्कार केला.

नाटककाराचे शब्द रसिकांपर्यंत पोहोचविणारा मी ‘लमाण’ असे म्हणणारे डॉ. श्रीराम लागू आणि मराठी रंगभूमीच्या पालखीचा भोई सुमीत यांची भेट ‘हॅम्लेट’ नाटकाच्या प्रयोगानंतर झाली. ‘कुणी घर देता का घर’ असे म्हणत रसिकांच्या काळजात घर करून बसलेल्या या नटसम्राटाला सुमीत राघवन याने नमस्कार केला. सुमीत राघवन याची भूमिका असलेल्या ‘हॅम्लेट’ नाटकाच्या प्रयोगाला डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांनी आवर्जून हजेरी लावली.

प्रेक्षागृहात बसलेल्या लागू यांना पाहून मी गहिवरून गेलो, असे सुमीतने सांगितले. डॉक्टर प्रयोगाला आले तर तीन तास बसू शकतील का, ही हुरहूर होती. पण त्यांनी नाटक पाहिले आणि हळूहळू उभं राहत त्यांनी आम्हाला मानवंदना दिली. त्यांना आमच्यासाठी टाळ्या वाजवताना पाहिले आणि मला अश्रू अनावर झाले. सन्मानापेक्षाही मी खऱ्या अर्थाने भरून पावलो, असे सुमीत राघवन याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor sumit raghavan meet natsamrat star dr shriram lagoo

ताज्या बातम्या