दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचे हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सुर्याचे लाखो चाहते आहेत. फक्त तामिळनाडूचे लोक त्याच्यावर फक्त भरभरून प्रेम करत नाहीत, तर संपूर्ण देशातील लोकही त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. सुर्या हा देखील त्याच्या चाहत्यांवर तितकचं प्रेम करतो. त्यांना मदत करण्यास तो सदैव तत्पर असतो. फक्त चित्रपटातला हीरो नाही तर खऱ्या आयुष्यातही हीरो बनत तो लोकांना मदत करतो. याचे उदाहरण म्हणजे नुकताच सूर्य अपघातात मृत्युमुखी पडलेल्या त्याच्या एका चाहत्याच्या घरी पोहोचला. तिथे जाऊन कुटुंबीयांची सांत्वना केली, एवढचं नाही तर त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू असे आश्वासनही सुर्याने त्यांना दिले.

जगदीश असे मृत्यू झालेल्या सुर्याच्या चाहत्याचे नाव आहे. त्याचा रस्त्यात अपघातात मृत्यू झाला. नामक्कल येथील सूर्याच्या फॅन क्लबचे जगदीश सचिव होता. आता जगदीशच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी ऐकून सूर्या त्याच्या घरी पोहोचला. तिथे गेल्यावर सुर्याने जगदीशच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या दुःखात सहभागी झाला. त्यानंतर त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही दिले. इतकेच नाही तर सूर्या जगदीशच्या पत्नीला नोकरी देण्यास आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, असा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. सुर्याच्या जगदीश यांच्या घरी भेट दिल्याचे फोटो त्याच्या फॅनपेजवर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सुर्या जगदीशच्या फोटोला फुलं अर्पण करताना दिसत आहे.

आणखी वाचा : नवऱ्यासाठी नवस! अभिनेता सुरज थापरच्या पत्नीने केले मुंडण, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

आणखी वाचा : ‘पृथ्वीराज’साठी भाजपावर अवलंबून आहे अक्षय कुमार, अभिनेत्याचा अक्कीला टोला

दरम्यान, सुर्या शेवटी Etharkkum Thunindhavan मध्ये दिसला होता. आता तो चित्रपट निर्माता बालासोबत त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र दोन दशकांनंतर हे दोघे एकत्र आले आहे. बाला आणि सुरिया यांनी २००३ मध्ये तमिळ चित्रपट Pithamagan मध्ये शेवटचे काम केले होते. याशिवाय सुरियाने निर्माता म्हणूनही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. सुर्याची निर्मिती कंपनी 2D एंटरटेनमेंट त्याच्याच ‘सोरारई पोटरु’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. ते एअर डेक्कनचे संस्थापक आहेत. यामध्ये राधिका मदान, परेश रावल आणि महेश बाबू देखील दिसणार आहेत.