तुम्हाला माहित आहे का हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने आतापर्यंत किती सिनेमे केले आहेत? जर माहित नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. टॉम क्रूझने त्याचे संपूर्ण फिल्मी करिअर हे नऊ मिनिटांच्या व्हिडिओमधूनन दाखवले आहे. यामध्ये त्याने त्याच्या नावाजलेल्या सिनेमांमधल्या प्रत्येकी एका दृश्यावर अभिनय केला आहे. या व्हिडिओमध्ये टॉम क्रूझ, जेम्स कॉर्डन याच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओची सुरुवात ‘टॉप गन’ या सिनेमातील एका दृश्याने होते. यात दोघंही एअरफोर्सच्या बेस कॅम्पच्या इथे पायलटच्या पेहरावात दिसतात. यानंतर त्यांना ‘डेज ऑफ थंडर’ या सिनेमातल्या एका दृश्यावर अभिनय केला आहे. ‘रेन मॅन’ आणि ‘ट्रॉपिक थंडर’ या सिनेमातली दृश्य यानंतर दिसतात. या व्हिडिओच्या शेवटी ‘रिस्की बिझनेस’चे एक दृश्य आहे. हा व्हिडिओ ‘द लेट लेट’ शोने बनवला आहे. या नऊ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या सर्वच सिनेमांबद्दल दाखवले गेले नाहीए. पण त्याच्या आतापर्यंतच्या गाजलेल्या सिनेमांची दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.
हॉलिवूड चित्रपटसृष्टीतलं टॉम क्रूझ हे नावाजलेलं नाव आहे. या अभिनेत्याची गणती हॉलिवूडमधल्या महागड्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याची चर्चा देश विदेशात झाली नाही असे कधीच झाले नाही. त्याचा आतापर्यंतचा सर्वात गाजलेला सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल’चे आतापर्यंत पाच भाग आले आहेत. या सिनेमाचा शेवटचा भाग गेल्या वर्षी आला होता. सिनेमाच्या या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. याच सिनेमाच्या पुढच्या भागाची तयारीही सुरु झाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याशिवाय ‘द लास्ट समुराई’ या सिनेमात त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते. या सिनेमात त्याने मद्यपान करणाऱ्या योद्ध्याची भूमिका साकारली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले होते. ‘रेन मॅन’ हा त्याच्या करिअरच्या सुरुवातीचा सिनेमा होता. यात त्याने डस्टिन हॉफमॅनसोबत काम केले होते. या सिनेमात तो एका सहकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. पण त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor tom cruise recreates his entire film career in 9 minutes video
First published on: 20-10-2016 at 20:50 IST