अ‍ॅक्शन सीन शूट करताना अभिनेत्याला गंभीर दुखापत; ICU मध्ये उपचार सुरु

अंतर्गत रक्तस्त्राव होऊन अभिनेता पडला बेशुद्ध

दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस ‘काला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. कोचीमधील रेनाई मेडिसीटी या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. चित्रपटातील एका स्टंटचं शूटिंग सुरु असताना त्याच्या छातीला दुखापत झाली. परिणामी अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होऊन तो बेशुद्ध पडला. सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स; किंमत पाहून तुम्हाला येईल चक्कर

मातृभूमी या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार टोविनोची प्रकृती सध्या स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. स्टंट करताना त्याच्या पोटावर आणि छातीवर जबरदस्त मार बसला. दरम्यान त्याच्या फुफ्फुसांवर जखम होऊन अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे टोविनला श्वास घेताना थोडा त्रास होत आहे. सध्या अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor tovino thomas hospitalised after accident on kala set mppg

ताज्या बातम्या