Varun Tej and Lavanya Tripathi son Vaayuv first birthday face reveal photo: लोकप्रिय तेलुगू अभिनेता वरुण तेज कोनिडेलाचा मुलगा एक वर्षाचा झालाय. वरुण व त्याची पत्नी लावण्या त्रिपाठी यांनी मुलाच्या पहिल्या वाढदिवशी त्याचा चेहरा दाखवला. त्यांच्या मुलाचं नाव वायुव आहे. फोटोंमध्ये वायुव खूपच क्यूट दिसतोय. वरुण व लावण्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

वरुण तेज व लावण्या त्रिपाठी यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं होतं. गुरुवारी त्यांच्या लाडक्या वायुवचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने दोघांनीही इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केल्या. तसेच वायुवचे फोटो शेअर करून पहिल्यांदाच त्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला.

वरुण तेजची पोस्ट

वरुणने वायुवबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत तो व लावण्या प्रेमाने वायुवकडे बघतायत, तर दुसऱ्या फोटोत वरुणने वायुवला जवळ घेतलंय. “माझ्या लाडक्या बाळा, तू माझं जग खूपच सुंदर पद्धतीने बदलून टाकलंस. तुला पहिल्यांदा डोळे भरून पाहण्यापूर्वीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुझा बाबा असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहे. पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, वायुव, आय लव्ह यू,” असं कॅप्शन वरुण तेजने फोटोंना दिलंय.

वरुण तेजच्या फोटोवर पीव्ही सिंधूने ‘क्यूट, वायुव तुला पहिल्या वाढिदवसाच्या शुभेच्छा’ अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर नेहा रेड्डी, उपासना कामिनेनी, निहारिका कोनिडेलासह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

PV Sindhu comment on Varun Tej-Lavanya Tripathi Son photos
वरुण तेजच्या पोस्टवरील पीव्ही सिंधूची कमेंट

लावण्या त्रिपाठीने फोटो पोस्ट करत लिहिलं, “माझ्या बाळा, मला तुझी आई म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. तू आमच्या आयुष्यात येण्याआधी मला वाटायचं की मला प्रेम म्हणजे काय हे माहीत आहे. पण जेव्हा तू आलास, तेव्हा मला एका अगदी वेगळ्या प्रेमाची जाणीव झाली… असं प्रेम जे माझ्या शरीराच्या बाहेर राहतं, तरीही ते माझ्याच अस्तित्वाचा सर्वात खोल भाग असल्यासारखं वाटतं.
तुझ्या रूपाने आम्हाला हे सुंदर वरदान दिल्याबद्दल धन्यवाद! तुझं ते छोटंसं हसू, तुझे लहान-लहान हात, तुझ्या बाललीला यांनी आमचं घर भरून टाकल्याबद्दल खूप खूप आभार.

Lavanya Tripathi share first photos revealing son Vaayuv face on 1st birthday
लावण्या त्रिपाठीची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

तू मला अत्यंत सुंदर पद्धतीने बदलून टाकलंय. तू म्हणजे माझंच हृदय आहेस जे माझ्या शरीराबाहेर धडधडतंय. तू माझं सर्वात मोठं वरदान आहेस. तू आमचं जग आहेस, वायुव…बाळा, तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”