लोकसत्ता प्रतिनिधी

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला हरहुन्नरी अभिनेता विकी कौशलने अगदी कमी कालावधीत रसिकांच्या मनात आणि चित्रपटसृष्टीतही आपले स्थान निर्माण केेले आहे. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर २०१५ साली त्याने ‘मसान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे ‘राजी’, ‘संजू’, ‘मनमर्जिया’, ‘सरदार उधम’, ‘सॅम बहादूर’ अशा अनेक चित्रपटांतून विकीने आपल्या अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या विकी त्याच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामुळे चर्चेत आला. या चित्रपटात त्याच्या अभिनयाबरोबरच त्याचे नृत्य कौशल्यदेखील प्रेक्षकांना फार आवडले आहे. या चित्रपटात विकी कौशलबरोबर तृप्ती डिमरी आणि अॅमी वर्क या दोघांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आजवरची वाटचाल आणि भविष्यातील चित्रपटांबद्दल विकी कौशलने ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
Mohanlal addresses media regarding Hema Committee report
Mohanlal on MeToo: मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना विकी म्हणाला, ‘या चित्रपटात मी अखिल चड्डा नामक तरुणाच्या भूमिकेत आहे. दिल्लीत राहणारा आणि तिथल्या शैलीनुसार जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यावर भर देणारा असा हा तरुण आहे. या चित्रपटातील अखिलची व्यक्तिरेखा आणि माझ्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे आम्हा दोघांनाही पंजाबी गाण्यांची फार आवड आहे. पण, वास्तविक आयुष्यात मी अखिलपेक्षा जास्त समजूदार आहे’. हा त्याचा दिग्दर्शक आनंद तिवारीबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. आनंद स्वत: एक उत्तम अभिनेता आहे, त्यामुळे त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभव कसा होता? याबद्दल बोलताना विकीने आनंदबरोबर पहिल्यांदा ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ या चित्रपटात काम केलं होतं असं सांगितलं. तो आनंदचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. ‘बॅड न्यूज’ हा आमच्या दोघांचाही दुसरा एकत्र चित्रपट आहे.

हेही वाचा >>>“ज्यावेळी पालक आपल्या मुलांवर संस्कार करतात, त्यावेळी तू…”,रामानंद सागर यांनी स्वप्नील जोशीला दिला होता सल्ला

गेल्या दहा वर्षांत विकी कौशलने केलेल्या चित्रपटांमध्ये देशभक्तीपर चित्रपटांची संख्या किंचित जास्त आहे आणि त्याला त्या भूमिकेतून पसंतीही मिळाली आहे. मात्र असे असले तरी मला हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्या प्रकारच्या आशय-विषयांवरील चित्रपटात काम करायची इच्छा आहे, असं विकी म्हणतो. आजवर मी ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापलीकडे जात माझ्यातील नटाला आव्हान देणारी, ओळखणारी भूमिका दिग्दर्शकांकडून यावी आणि अभिनेता म्हणून सातत्याने समृद्ध करणारी माझी वाटचाल असावी, हे आपलं ध्येय असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाबद्दलही म्हणूनच त्याला कौतुक वाटत असल्याचंही त्याने सांगितलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. हा त्याचा पहिलाच ऐतिहासिकपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांविषयी अधिक जाणून घेण्याचं आणि त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर रंगवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, असं विकी म्हणतो. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल, अशी माहिती त्याने दिली.

विकीचा पहिला चित्रपट ‘मसान’च्या आठवणींना उजाळा देताना, ‘मसान’ हा माझा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटामुळे माझ्यात केवळ कलाकार म्हणून नाही, तर एक माणूस म्हणूनही अनेक बदल झाले, असं विकीने सांगितलं. ‘मला ‘मसान’च्या निमित्ताचे बनारसच्या घाटावर जाऊन तेथील लोकांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्या लोकांचं जीवन हे त्या घाटापुरतंच मर्यादित आहे. तिथले लोक किती साध्या पद्धतीचं आयुष्य जगतात हे मी जवळून अनुभवलं. शहरातल्यासारखं जीवन जगण्याचं स्वप्नं ती मंडळी पाहात नाहीत, आहे त्यात आनंदाने ते आयुष्य जगतात. त्यांच्यातला नम्रपणा मला भावला, त्यामुळे सेटवरचा मी आणि माझ्या अवतीभवती काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन प्रचंड बदलला. त्यांच्याबद्दल माझ्या मनात विशेष आदर निर्माण झाला’, अशी आठवणही विकीने सांगितली.

कतरिना आणि मी…

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या प्रेमाची, लग्नाची गोष्ट ही एखाद्या परिकथेपेक्षा कमी नाही. हे दोघेही पूर्णत: वेगवेगळ्या देशात आणि वातावरणात वाढलेले आहेत. त्यामुळे दोघांचाही स्वभाव अगदी भिन्न असल्याचे विकी सांगतो. ‘मी अत्यंत व्यावहारिक विचार करतो, तर कतरिना प्रचंड हुशार आहे आणि तेवढीच हळवीही आहे. त्यामुळे ज्या क्षणापासून आम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार झालो आहोत, तेव्हापासून जगाकडे, कामाकडे आणि स्वत:कडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. ज्यावेळी तुम्ही दोन वेगळ्या विचारधारेतून आयुष्याकडे पाहता तेव्हा नक्कीच एक माणूस म्हणून तुमच्यात अमूलाग्र बदल होतो. आम्ही दोघंही मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यामुळे एकमेकांची मतं, विचार यांची देवाणघेवाण होते आणि त्याचा फायदा एकप्रकारे कलाकार म्हणून स्वत:ला समृद्धपणे घडवताना होतो’, असं विकीने सांगितलं.