आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी तरी भूतांच्या दंतकथा ऐकलेल्या आहेत. भूत आहे किंवा नाही याबाबत फार विविध मत व्यक्त केली जातात. काहीजण भूत आहेत, मी त्याचा अनुभव घेतला आहे, असे सांगतात. तर काहीजण भूत वैगरे काहीही नसतं असंही सांगताना दिसतात. पण एखाद्यावेळी तुम्हाला अचानक भुताचा भास झाला तर…तुमचीही बोबडी वळली ना. अशीच अवस्था सध्या मराठी अभिनेता विराजस कुलकर्णी याची झाली आहे. नुकतंच त्याने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

विराजस हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने भुताचा भास झाल्याचा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे. विराजसला हा अनुभव पुण्यातील एका रात्री रस्त्यावर झाल्याचेही त्याने यात म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश
Momos
मोमोज खाऊ घालण्यावरुन महाभारत! पत्नी पतीविरोधात थेट पोहचली पोलीस ठाण्यात, त्यानंतर जे घडलं..

प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोन नंबर झाला लीक, विकृतांनी मेसेज फोनवर केली शरीरसुखाची मागणी

या व्हिडीओ विराजस म्हणाला, मी माझ्या नाटकाचे काम संपवून मित्रासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघालो. माझा मित्र दुचाकी चालवत होता आणि मी त्याच्या मागे बसलो होतो. पुण्यातील एका रस्त्यावरून जात असताना मला आमच्या दुचाकीच्या वाटेत एक सायकल चालवत असलेला माणूस आल्याचा भास झाला. त्याने धोतर, पांढरा शर्ट, पांढरी गांधी टोपी असे कपडे परिधान करत ती व्यक्ती सायकल चालवत बाजूने गेले, असे मला वाटले. पण काही क्षणात ती व्यक्ती दिसेनाशी झाली.

यानंतर मी माझ्या मित्राला घट्ट पकडलं आणि त्याने त्या बाईकचा ब्रेक दाबत गाडी थांबवली. मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगावी की नको असा विचार करत होतो. तेवढ्यात त्या मित्राने मला सॉरी म्हटलं. त्यानंतर तो म्हणाला सॉरी मी असा अचानक ब्रेक लावला. मला पटकन एक पांढरे धोतर, शर्ट आणि टोपी घातलेले आजोबा सायकल घेऊन बाइकसमोर आल्यासारखं वाटलं. त्यामुळे मला अचानक ब्रेक लावावा लागला. त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर माझी बोबडी वळली. यानंतर मी त्याला म्हटलं, ऐक लगेच घरी चल..कुठेही गाडी थांबवू नको, असे सांगत आम्ही आपपल्या घरी पोहोचलो, असे विराजसने सांगितले.

“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. तसेच यावर अनेकांनी कमेंटही करत विराजसची चौकशीही केली आहे. मात्र त्याचीही पोस्ट नक्की खरी आहे की आगामी नाटकासंदर्भातील याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. कारण ही पोस्ट शेअर करतेवेळी त्याने त्याच्या ANATHEMA या नाटकाचा उल्लेख केला आहे. तसेच या पोस्टच्या शेवटी नाटकाचे एक पोस्टरही दिसत आहे. त्यामुळे त्याचे चाहते गोंधळात पडले आहेत.