फराह खानमुळे पहिल्यांदाच एकत्र येणार हृतिक-अनुष्का?

हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शिका फराह खान एका चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होती. इतकंच नाही तर तिच्या या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता हृतिका रोशन, दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा ही कलाकार मंडळी झळकणार असल्याची शक्यता होती. मात्र त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. परंतु आता या चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि अनुष्का शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हृतिक-अनुष्काचा हा आगामी चित्रपट १९८२ च्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी करणार आहेत. तर दिग्दर्शन फराह खान करणार आहे. मात्र अद्याप तरी या चित्रपटाचं नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.या चित्रपटाचं चित्रीकरण २०२०मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून त्यांची घोडदौड अद्याप सुरुच आहे. तर गेल्या वर्षी अनुष्का शर्मा झिरो या चित्रपटामध्ये झळकली होती. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actors hrithik roshan and anushka sharma signed for farah khan film ssj

ताज्या बातम्या