हे कलाकार साकारणार आहेत झहीर खान आणि सुरेश रैनाची भूमिका.. | Loksatta

हे कलाकार साकारणार आहेत झहीर खान आणि सुरेश रैनाची भूमिका..

अभिनेत्री कायरा आडवाणी साक्षी सिंग रावतच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे कलाकार साकारणार आहेत झहीर खान आणि सुरेश रैनाची भूमिका..

‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. धोनीच्या जीवनातील चढउतार प्रेक्षकांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचवण्यासाठी या चित्रपटात अनेक कलाकार विविध व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. टेलिव्हिजन विश्वातून नावारुपास आलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत या चित्रपटामध्ये कॅप्टन कूलच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी त्याने फार मेहनत घेतली असून, यासाठी त्याने क्रिकेटचे खास प्रशिक्षणही घेतले.
कॅप्टन कूलच्या जीवनावर साकारलेल्या या चित्रपटामध्ये अनुपम खेर धोनीच्या वडिलांच्या तर अभिनेत्री कायरा आडवाणी साक्षी सिंग रावतच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त जहिर खान आणि सुरेश रैना या खेळाडूंच्या व्यक्तिरेखाही या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिनेता गौतम गुलाटी या चित्रपटात झहीर खानच्या भूमिकेत दिसणार असून दाक्षिणात्य अभिनेता राम चरण सुरेश रैनाच्या भूमिकेत दिसणार आहे. धोनीसोबत त्याच्या अनेक खेळींमध्ये आणि त्याच्या काही दमदार भागीदारींमध्ये साथ देणाऱ्या युवराज सिंगच्या भूमिकेमध्ये अभिनेता हॅरी टॅंगरी या चित्रपटात दिसणार आहे. नीरज पांडेंच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती अरुण पांडे आणि फॉक्स स्टुडिओद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल बी टाऊनसह क्रिकेटविश्वामध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ३० सप्टेंबर रोजी ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.

MS Dhoni trailer: धोनीचा या तीन खेळाडूंना विरोध होता?

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-08-2016 at 17:30 IST
Next Story
VIDEO: ‘फोटोकॉपी’मधील फ्रेश जोडीचे फ्रेश गाणे ‘तू जिथे मी तिथे’