चाकूचा धाक दाखवून भर दिवसा अभिनेत्रीच्या घरात दरोडा

मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

chandigarh, chandigarh crime news, chandigarh news, alankrita sahai, alankrita sahai robbed, chandigarh police
अभिनेत्रीने या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे.
इंटेरिअर डिझायनर आणि अभिनेत्री अलंकृता सहायच्या घरात चोरांनी चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी ही भयानक घटना घडली आहे. अलंकृता ही चंदीगढमधील सेक्टर २७ मधील एका इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहाते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती तिच्या घरात शिरले. त्यांनी अलंकृताला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडून साडेसहा लाख रुपये लुटले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलंकृताने काही दिवसांपूर्वी घरासाठी फर्निचर खरेदी केले होते. रविवारी तिच्या राहत्या घरी ते पोहोचवण्यात आले. हे फर्निचर पोहोचवणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही दरोडेखोर असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. अलंकृताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घाबरल्यामुळे तिने स्वत:ला बाथरुमध्ये बंद करुन घेतले होते. चोरांनी अलंकृताकडून तिचे एटीएम आणि त्याचा पीन मागितला होता. एका चोराने तिच्या एटीएममधून ५० हजार रुपये काढले आणि एटीएम तिला परत केले. असे करे पर्यंत इतर दोघे अलंकृतावर नजर ठेवून होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alankrita Sahai (@ladykrita)

अलंकृता मदतीसाठी मोठ्याने ओरडू लागल्यानंतर चोरांनी तिच्या घराच्या बाल्कनीमधून पळ काढला. त्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीमध्ये उड्या मारल्या आणि नंतर ते तळ मजल्यावर पोहोचल्याची माहिती अलंकृताने दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actress alankrita sahai held hostage avb

ताज्या बातम्या