scorecardresearch

आलिया भट्ट बनली गायिका, गायले ‘हे’ लोकप्रिय गाणे

आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत आलिया चक्क गाणे गाताना दिसत आहे.

आलिया भट्ट बनली गायिका, गायले ‘हे’ लोकप्रिय गाणे
अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

बॉलीवूड ब्युटी आलिया भट्ट काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. लग्नाच्या काही दिवसांनंतर लगेचच आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी दिली. तेव्हापासून सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे लागले आहे. तर सध्या ती तिच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर आणि आलिया एकत्र विविध ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे. अलीकडेच, हे स्टार कपल एकत्र दिसले. यावेळचा आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत आलिया चक्क गाणे गाताना दिसत आहे.

आणखी वाचा : विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरला आयएमडीबी साईटवर सर्वात कमी रेटिंग्स मिळवणारा चित्रपट

रणबीर आलिया नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी आलिया भट्टने तिच्या या आगामी चित्रपटातील लोकप्रिय झालेले ‘केसरिया’ हे गाणे सर्वांसमोर गायले. आलियाचा मधुर आवाज ऐकून चाहते भारावून गेले आहेत. आलिया एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. आलिया जेव्हा स्टेजवर गात होती तेव्हा तिचा पती अभिनेता रणबीर कपूर तिच्याकडेच पाहत होता. तर गाणे संपल्यावर रणबीरने टाळ्या वाजवत आलियाचे कौतुकही केले. आलिया भट्टचा हा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा : अभिनेत्री आलिया भट्टने शेअर केले ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या सेटवरचे अनसीन फोटो

प्रेग्नेंसीनंतर अभिनेत्रीचे करिअर संपते, हा विचार मोडीत काढत आलिया भट्टने एक वेगळेच उदाहरण मांडले आहे. आलिया भट्ट तिच्या प्रेग्नेंसीदरम्यानही काम करत आहे. अलीकडेच, ती तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग संपवून परतली आहे. तर सध्या ‘ब्रम्हास्त्र’चे प्रमोशन करताना ती दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया आणि रणबीर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.