मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान लावणी या लोकनृत्यावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तरे दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडमधील परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सवाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आहेत. या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे या गणेशोत्सवाची सुरुवात लावणीने झाली होती. त्यामुळे सर्वत्र यावरुन टीका केली जात आहे. या टीकेला धनंजय मुंडेंनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता अमृता खानविलकरने यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “चंद्राची भूमिका तुझ्यासाठी नेमकी काय?” अमृता खानविलकर म्हणते “ती फक्त लावणी…”

अमृता खानविलकर नेमकं काय म्हणाली?

“मी धनुभाऊंच्या कृपेने गेल्या कित्येक वर्षांपासून परळीत येत आहे. इकडे आली की लावणी पाहिजेच, सतत परफॉर्म करते. मात्र अनेक माध्यमातून लावणीला गालबोट लागल्यासारखं झालंय, याचं वाईट वाटतंय. पण मी एवढंच सांगू इच्छिते की लावणी ही आपली ओळख आहे. आज ती जगभरात प्रसिद्ध आहे.

त्यामुळे कुठेही तिला वेगळ्या नजरेने किंवा खालच्या नजरेने बघणं पाप आहे, असं मला वाटतं. त्यासोबत प्रेक्षकांचा जल्लोष, मिळणारा वन्समोअर हे सर्व लावणी आहे म्हणून मिळत आहे. तेव्हा माझी अनेक प्रसारमाध्यमांना अशी नम्र विनंती आहे की, लावणी जिचा जन्म महाराष्ट्रात झालाय, ती आपली आहे, आपल्या मातीतली आहे. तिला वेगळ्या नजरेने बघू नका. तुमच्या काही व्ह्यूजसाठी त्याला ट्रोलिंग करु नका.

आज आम्ही कलाकार म्हणून इथे येतो आणि त्या कलेचा मान राखतो. ज्या धनुभाऊंनी आम्हाला बोलवलंय त्यांचा मान राखतो. लावणी ही शृंगारक असली तरी ती धार्मिक आहे असे मला वाटतं. शृंगार हा एखाद्या स्त्रीने कसा प्रस्तुत करावं याचं जागतं उदाहरण लावणी आहे. एक कलाकार म्हणून एवढीच विनंती करु इच्छिते की एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम एकतर कोणी करत नाही. जर कोणी करत असेल तर त्याला गालबोट लावू नका”, असं आवाहन अमृता खानविलकरने केले.

आणखी वाचा : अमृता खानविलकर हॉटेलमधील रुमचे सर्व लाईट्स चालू ठेवून का झोपते? खुलासा करत म्हणाली…

अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका साकारली होती. यामुळे तिला चांगलची प्रसिद्धी मिळाली. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress amruta khanvilkar comment about lavani dance form trollers trolling rno news nrp
First published on: 04-09-2022 at 11:54 IST