अमृताचा नवा ‘लुक’!

या चित्रपटात ती नव्या हेअरकटच्या लुकमुळे चर्चेत आहे.

amruta-khanvilkarपाच महाविद्यालयीन युवक आणि त्यांचे आई-वडील यांच्या नात्यातील कथा असलेल्या आगामी ‘बसस्टॉप’ या मराठी चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर एका वेगळ्या ‘लुक’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमृताचे ‘ग्लॅमरस’ रूप या अगोदर पाहायला मिळाले असले तरी या चित्रपटात ती नव्या हेअरकटच्या लुकमुळे चर्चेत आहे.

श्रेयस जाधव निर्मित आणि समीर जोशी दिग्दर्शित ‘बसस्टॉप’ या चित्रपटात अमृतासह हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार आहेत. या चित्रपटात अमृताची भूमिका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचीच आहे. नव्या केशरचनेमुळे अमृताला हा नवा लुक मिळाला आहे. मात्र खास ‘बसस्टॉप’साठी तिने हा नवा लुक धारण केलेला नाही. तर त्या अगोदरच काही कारणाने तिला तिचे लांब केस कमी करावे लागले होते. अमृताच्या या नव्या केशरचनेचे खूप कौतूक झाले. याच दरम्यान ‘बस स्टॉप’ ची ऑफर तिला आली आणि काही कारणाने का होईना, अगोदरच झालेला बदल चित्रपटातील या भूमिकेसाठी अमृताच्या पथ्यावरच पडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actress amruta khanvilkars new look for movie busstop