बॉलिवूड कलाकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेता आयुष्मान खुराणा आणि ‘लायगर’ फेम अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या गाण गाताना दिसत असून आयुष्मान त्यावर थिरकताना दिसत आहे. अभिनेता आयुष्मान खुराणाचा काल(१४ सप्टेंबर) वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अनन्या ‘ये काली काली ऑंखे’ हे गाण्याचे बोल म्हणत आहे. तर आयुष्मानने यावर डान्स केला आहे. व्हिडीओच्या शेवटी अनन्याही या गाण्याच्या हूक स्टेप्स करताना दिसत आहे. हेही पाहा >> Photos : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, कमेंट करत म्हणाले “तू तर हुबेहुब…” आयुष्मान उत्तम अभिनेत्याबरोबरच गायकही आहे. म्हणूनच अनन्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये “यावर्षी तुझ्याकडील खाद्यपदार्थ शेअर कर आणि तुझी पार्श्वगायक होण्यासाठी मी दिलेली ही ऑडिशन आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आयुष्मानचा भन्नाट डान्स पाहून 'पिंकविला'ने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘टॅलेन्ट’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “अनन्याला स्टेप्स आठवल्या नाहीत”, असं म्हटलं आहे. हेही वाचा >> कपूर कुटुंबियांकडून आलियाच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी, ‘हे’ कलाकार होणार सहभागी अनन्या पांडे सध्या इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'लायगर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आयुष्मान खुराणा 'शूट द पिआनो प्लेअर', 'गुगली', 'बधाई हो २' या चित्रपटांची मेजवाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.