“गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं” असं म्हणत जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये आजही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील राधिका ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अनिता दाते हिने साकारली होती. या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनिता दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीवर लवकरच एका नव्या मालिकेची सुरुवात होणार आहे. नवा गडी नवं राज्य असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

या मालिकेत अनिता दातेचं पात्र या जगात नसल्याचे दाखवण्यात आले आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एंट्री घेत आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असं ठेवण्यात आलं आहे. या मालिकेतून एक आगळावेगळा विषय पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा एक नवा प्रोमो नुकतच प्रदर्शित करण्यात आला आहे. “जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो…. त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट….” असे खास कॅप्शन या प्रोमोला देण्यात आले आहे.

‘काय झालंय नक्की?’ अभिनेत्री अनिता दातेची पोस्ट पाहून कलाकारांसह चाहतेही संतप्त

यात अनिताच्या पात्राचे नाव रमा असे आहे. तर पल्लवी पाटील ही आनंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, वर्षा दांदळे हे कलाकारही पाहायला मिळत आहे. दरम्यान घरात आलेल्या या नव्या आनंदीचा स्वीकार आता वेगवेगळ्या नात्यांमध्ये होणार का? तिच्यावर आलेलं हे राज्य ती पेलू शकणार का? आणि रमा या सगळ्यात मोडता घालणार का मदत करणार हे पाहणं गंमतशीर ठरणार आहे.

“आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन…”, अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी अनिताने या मालिकेशी संबंधित एक फोटो पोस्ट केला होता. यात तिच्या फोटोला हार घातल्याचे दिसून आले होते. तिचा हा फोटो पाहून अनेक चाहत्यांना तसेच कलाकारांना धक्का बसला होता. तिने हा फोटो शेअर करताना फार हटके कॅप्शन दिले होते. “जो आवडतो सर्वांना…” असे कॅप्शन अनिता दातेने दिले होते. तिच्या या फोटोमुळे आणि कॅप्शनमुळे सर्वांना धक्का बसला होता.