actress ankita lokhande dancing on mohe rang do lal song video viral spg 93 | Video : दीपिकाच्या गाण्यावर अंकिता लोखंडेचा डान्स; नेटकरी म्हणाले... | Loksatta

Video : दीपिकाच्या गाण्यावर अंकिता लोखंडेचा डान्स; नेटकरी म्हणाले…

तिचा डान्स बघून नेटकरीदेखील थक्क झाले आहेत.

Video : दीपिकाच्या गाण्यावर अंकिता लोखंडेचा डान्स; नेटकरी म्हणाले…
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री अंकिता लोखंडे जैन कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकांबरोबरच अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे.

अंकिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे. नुकतंच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘बाजीराव मस्तानी ‘चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यावर तिने डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये ती या गाण्यावर डान्स करत आहे तर दुसरीकडे टीव्हीवर चित्रपटातील गाणे लागले आहे. तिचा डान्स बघून नेटकरीदेखील थक्क झाले आहेत.

“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा

अंकिताचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे ‘सुंदर’ तर दुसर्‍याने ‘वाह’ अशी प्रतिक्रिया दिली आहे, मात्र काहीजणांनी तिची खिल्ली उडवली आहे. “संपूर्ण घर दाखवतेस का आम्हाला?” अशा शब्दात एकाने टोला लगावला आहे तर एकाने लिहले आहे “ही नुसती दिखावा करत असते.”

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘बाघी ३’ आणि कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातही अंकिता दिसली होती. अंकिता पती विकी जैनसह २०२१च्या डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकली. ती आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:16 IST
Next Story
“त्यात आक्षेप घेण्यासारखं काय?” महेश मांजरेकरांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर