scorecardresearch

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार वेगळ्या माध्यमात, साकारणार नवी भूमिका

मालिका आणि चित्रपट विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार वेगळ्या माध्यमात, साकारणार नवी भूमिका

मालिका आणि चित्रपट विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. आभास हा या मालिकेतून तिने आपला अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू केला. ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये तिने साकारलेली शेवंता या पात्राला तूफान लोकप्रियता मिळाली. परंतु ही मालिका काही कारणाने तिने मध्यातच सोडली. त्यानंतरही ती वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून समोर आली. आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.

हेही वाचा : मिस ‘पू’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार? करीनाने दिले संकेत

अभिनेत्री “अपूर्वा नेमळेकर” आता स्वयंभू स्टुडीओसच्या नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “द डीलीवरी बॉय” असे ह्या कलाकृतीचे नाव आहे. ही एक शॉर्टफिल्म आहे. ह्यात अपूर्वा नेमळेकर सोबतच अभिनेता सुजीत देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी सुजीतने ‘मोलकरीण बाई’, ‘स्वामिनी’ या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

अपूर्वा आणि सुजीतने शूटिंगच्या पहिल्या दिवशीचे काही फोटो शेअर करत ‘एका सुंदर प्रवासाची, सौंदर्यासोबत नवी सुरुवात, स्वयंभू स्टुडिओची नवी कलाकृती लवकरच’. असं कॅप्शन दिलं आहे. या नव्या शॉर्टफिल्मचे लेखन शैलेश देशपांडे यांनी केले असून अभिषेक रत्नपारखी आणि सुजीत देशपांडे यांचे दिग्दर्शन आहे. नुकतेच याचे शूटिंग पूर्ण झाले. लवकरच ही शॉर्टफिल्म प्रदर्शित होईल.

आणखी वाचा : मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती, आणखी एका धमाकेदार कलाकृतीची घोषणा, ‘त्या’ सहा जणींची रंगतेय चर्चा

दरम्यान, अपूर्वा लवकरच बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘राव रंभा’मध्ये झळकणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले, अशी माहिती तिने सोशल मिडियावरून दिली आहे. त्यामुळे अपूर्वाला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकेगत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या