scorecardresearch

बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “सत्याचा…”

बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

bhagyashree mote sister marathi actress
बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री मोटे नावारुपाला आली. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाग्यश्री व तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं आहे. मात्र तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. शिवाय मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत.

आणखी वाचा – प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बहिणीचं निधन, महिन्याभरापूर्वीच पतीलाही गमावलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मृत्यू अटळ आहे पण…”

सध्या या सगळ्या प्रकरणाचा वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचं काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथं मधूला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. दातखिळीही बसल्याने मैत्रिणीने ती काढण्याचा प्रयत्न केला. मधूला तिची मैत्रीण तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन गेली. परंतू, तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं.

तिथे गेल्यानंतर मधूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये भाग्यश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणाली, “सत्याचा विजय होईल”. फेब्रुवारी महिन्यामध्येच भाग्यश्रीच्या बहिणीच्या पतीचं निधन झालं होतं. यादरम्यान भाग्यश्रीने फोटो पोस्ट करत माहिती दिली होती.

आणखी वाचा – अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू, नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

शिवाय भाग्याश्रीने बहिणीबरोबरचे फोटोही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. “तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईतील”. असं भाग्यश्रीने म्हटलं होतं. मधूच्या मृत्युविषयी संशय असल्याचं तिचेचे मामा संतोष पोकळे यांनी सांगितलं होतं. आता या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 13:27 IST
ताज्या बातम्या