सिनेसृष्टीत ७० च्या दशकात नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर बिंदू यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. मोना डार्लिंग या नावाने ओळखली जाणारी बिंदू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप खलनायकांपैकी एक समजली जाते. बिंदूने गेल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. पण तरीही त्यांच्या आयुष्यात त्यांना एका गोष्टीची खंत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे.

नुकतंच बिंदू यांनी ई टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी बिंदू यांना ‘तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची खंत आहे?’ असा प्रश्न विचारला होता. यावेळी त्या म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यात मातृत्वाचे सुख नव्हते. मला कधीही आई होण्याचे सुख मिळाले नाही. बिंदू यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या चंपकलाल झवेरी यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्या दोघांनी वयाच्या १५ व्या वर्षी लग्न केले. बिंदूला कशाचीही कमतरता नव्हती. संपत्ती, प्रसिद्धीपासून, नाव आणि पतीच्या प्रेमापर्यंत त्यांच्याकडे सर्व काही होते. पण त्या कधीच आई होऊ शकल्या नाही. बिंदू यांना आतापर्यंत या गोष्टीची खंत वाटते.”

हेही वाचा : विकी-कतरिनाच्या लग्नात विघ्न, राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

“माझ्या नशिबात मातृत्वाचे सुख नव्हते. मी आई होऊ शकली नाही. मी १९७७ मध्ये प्रेग्नेंट होती. या काळात मी शूटिंगही थांबवलं. मात्र प्रेग्नंसीच्या काळात काही तरी कॉम्पलिकेशन निर्माण झाले. प्रेग्नंसीच्या ६ महिन्यातच मी माझे बाळ गमावले. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी माझ्या घरी डोहाळजेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे माझ्यासाठी तो क्षण फार दुख:द होता.” असे त्या म्हणाल्या.

“यावेळी सुनील दत्त आणि नर्गिस या मला धीर देण्यासाठी माझ्या घरी आले होते. शर्मिला टागोर यांनी मला खूप सुंदर पत्र लिहिले होते. मी त्या गोष्टी आणि ते क्षण अजिबात विसरू शकत नाही. यानंतर मी टेस्ट ट्यूब बेबी या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी परदेशात जाऊन उपचार घेतले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही,” असे बिंदू यांनी सांगितले.

हेही वाचा : Video : “आता म्हातारी झाल्यावर हौस पूर्ण करतेय”, कपड्यांवरुन संगीता बिजलानी ट्रोल

“यानंतर आम्ही टेस्ट ट्यूब बेबीसाठी प्रयत्न केले. मी लंडनला गेली आणि तिथे डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले. पण काहीही फायदा झाला नाही. मी तिथे दीड महिना, तीन महिने असे राहत होती. पण त्यावेळी मला सांगण्यात आले की मला तिथे एक वर्ष राहावे लागेल आणि ते त्यावेळी माझ्यासाठी शक्य नव्हते. प्रत्येक स्त्रीला आई व्हायचे असते. पण नशीब जे काही देईल त्यात त्यांनी आनंदी राहण्यास शिकायला हवे,” असेही बिंदू म्हणाल्या.