‘मला पाहून महिला त्यांच्या पतीला…’, बिंदू यांचा धक्कादायक खुलासा

अनेक महिला त्यांना शिवीगाळ देखील करत असत असे त्यांनी म्हटले आहे.

bollywood news, bindu on miscarriage and motherhood, bindu, actresses of 70s and 80s, Actress Bindu Says People Abused Her, actress bindu husband and family life, actress bindu husband, Actress Bindu Big,

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी काही वर्षे प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. पण आज त्या अभिनेत्री गायब असल्याचे दिसत आहे. या यादीमधील एक नाव म्हणजे बिंदू. ७०च्या दशकात बिंदू यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. पण काही भूमिकांचा बिंदू यांच्यावर मोठा परिणाम झाला होता.

बिंदू यांनी नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी करिअरमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चित्रपटातील निगेटीव्ह भूमिकांचा त्यांच्या खऱ्या आयुष्यावरही परिणाम झाला होता. ‘जेव्हा पुरुष चाहते मला भेटायला यायचे तेव्हा त्यांच्या बायका त्यांना खेचून घेऊन जायच्या. मला पाहून त्या पतीला लपवायच्या. त्यांना भीती वाटायची की मी त्यांच्या पतीला पळून नेईन. पण आता लोकांना रील आणि रियल लाइफ यातील फरक माहिती आहे’ असे बिंदू यांनी सांगितले.
आणथी वाचा : पहिल्या पत्नीवर फरहान अख्तरचे होते जीवापाड प्रेम, ‘या’ अभिनेत्याच्या भावामुळे मोडला १९ वर्षांचा संसार?

पुढे त्या म्हणाल्या, ‘खरं तर मी खूप हळव्या मनाची आहे. कुणाला माझ्यामुळे त्रास होत असेल किंवा कोणाचे मन दुखावले जाणार असेल तर मला खूप वाईट वाटते. मी त्या गोष्टी करत नाही.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress bindu reveals women would hide their husbands from her people used to abuse her avb