scorecardresearch

“जेव्हा मी माझ्या मुलांना दूध पाजले तेव्हा…”, स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यात तिने ती कर्करोगाशी कशाप्रकारे लढा देत आहे याचीही माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल ही गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने विविध मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतंच छवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला झालेल्या गंभीर आजारबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. यात छवीने तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे, असे सांगितले आहे.

छवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच छवीने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ती कर्करोगाशी कशाप्रकारे लढा देत आहे याचीही माहिती दिली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

“१८ वर्षांपूर्वी मी आईला गमावलं आता…”; प्रसिद्ध अभिनेत्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान

“प्रिय स्तन, ही तुमच्यासाठी प्रेरणादायी पोस्ट आहे. मी तुझी जादू पहिल्यांदाच जाणवली तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर जेव्हा मी माझ्या मुलांना दूध पाजले तेव्हा तुझे महत्त्व आणखी वाढले. आज तुमच्यापैकी कोणी कॅन्सरशी लढत असेल, तर तुमच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ माझी आहे. हे सर्व घडणे ही सर्वोत्तम गोष्ट नाही. परंतु यामुळे मला निराश होण्याची गरज नाही. हे माझ्यासाठी निश्चित सोपे नसेल. पण ते अवघडही नसावे. कदाचित मी पुन्हा पहिल्यासारखी दिसणार नाही.”

“पण त्यामुळे मला वेगळे वाटून घेण्याची गरज नाही. त्यासोबतच स्तनाचा कर्करोगापासून वाचलेल्या सर्वांना शुभेच्छा. मला तुमच्याकडून किती प्रेरणा मिळते, याची तुम्हाला कल्पना नाही. तुमच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही केलेले कॉल्स, मेसेज, भेटण्यासाठी वेळ काढणे, हे सर्व कौतुकास्पद आहे”, अशी पोस्ट छवीने शेअर केली आहे.

दरम्यान तिच्या या पोस्टरवर छवीची मैत्रीण मानसी पारिखने कमेंट केली आहे. ‘तुला ही लढाई जिंकून बाहेर पडायचे आहे. खूप प्रेम आणि प्रार्थना.’ असे तिने यात म्हटले आहे. तर तिची आणखी एक मैत्रीण पूजा गौर हिने म्हटले की, ‘मी तुझ्या जखमा भरण्यासाठी शक्ती पाठवत आहे. सगळे काही ठीक होईल. तू लवकरच यातून बाहेर येशील.’

दरम्यान छवी मित्तलने आतापर्यंत ‘कृष्णदासी’, ‘तीन बहुराणी’, ‘घरची लक्ष्मी कन्या’ यांसह अनेक मालिका केल्या आहेत. तिचे पती मोहित हुसैन यांची स्वतःची डिजीटल प्रॉडक्शन कंपनी आहे. त्यांना दोन मुले आहेत, एकाचे नाव अरहम आणि दुसरे अरिझा असे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress chhavi mittal fights breast cancer writes an inspiring and emotional note on social media nrp

ताज्या बातम्या