उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ वाघ यांच्यामधील वाद अजूनही सुरूच आहे. उर्फीने ट्वीट करत पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. तर चित्रा वाघ यांनी उर्फीला साडी-चोळी भेट म्हणून देणार असल्याचंही भाष्य केलं होतं. या वादामध्ये काही राजकीय मंडळींनीही आपलं मत मांडलं. आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चित्रा वाघ व उर्फी या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – Photos : घर, सोन्याचे दागिने अन् शेतजमीन; कोट्यवधींची मालकीण असलेल्या अमृता फडणवीसांवर आहे ६२ लाखांचं कर्ज

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “सोशल मीडियाचा आपण कशापद्धतीने वापर करतो? आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत आपण पोहोचत आहोत. काही बंधनं सोशल मीडियावरही असली पाहिजेत. उर्फी जावेद तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे. रस्त्यावर उभं राहून फोटो काढण्याची तिला परवानगी मिळाली आहे का? तशी उर्फी जावेदकडे परवानगी असेल तर तिला बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. पण परवानगी न घेता अशाप्रकारचे कपडे परिधान करून जर उर्फी रस्त्यावरच शूट करत असेल तर ते चुकीचं आहे.”

“फॅशला अधिक वाव आहे. फॅशन करा पण त्याला काही बंधनं असतात. प्रोफेशनल आणि रिअल लाइफ यामध्ये फरक आहे. हा फरक प्रत्येकाने समजला पाहिजे. उर्फीने काय खरं आणि काय खोटं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. या वादामध्ये सगळेच जण उतरले आहेत. पण मला असं वाटतं की रबर ताणली की तुटतो. त्यामुळे आधी योग्य तो निर्णय घ्या. उर्फीला सांगा, तिला समजवा. यापुढे परवानगीशिवाय तू शूट करू नकोस.”

आणखी वाचा – भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

पुढे दीपाली म्हणाल्या, “सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे कपडे तुम्ही परिधान करू नये. शॉर्ट्स, टी-शर्ट, फ्रॉक परिधान करणं यामध्ये फरक आहे. उर्फी जे कपडे परिधान करते ते ट्रान्सपरन्ट असतात किंवा कपडे परिधान न करण्याप्रमाणेच तिची ड्रेसिंग असते. उर्फीची जी हिंमत आहे त्याला मी सलाम करते. पण त्याच हिंमतीचा वापर ती वेगळ्या पद्धतीने करेल ती खूप मोठी होईल. आता उर्फी खूप मोठी झाली आहे. प्रत्येकाच्या तोंडामध्ये उर्फीचं नाव आहे. महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात उर्फी प्रसिद्ध झाली आहे. उर्फीने या सगळ्या गोष्टी लक्षात घेता स्वतः माघार घ्यावी. उर्फीला जी आता प्रसिद्धी मिळाली आहे तिचा तिने योग्य वापर करावा.”