"तिला कंट्रोल..." दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा | actress deepali sayyed reveled manasi naik pardeep kharera marriage condition interview viral nrp 97 | Loksatta

“तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा

मानसीच्या लग्नापूर्वी दीपालीने तिचा पती प्रदीपची भेट घेतली होती.

manasi naik, pardeep kharera, deepali sayyed
दीपाली सय्यद आणि मानसी नाईक या दोघीही एकमेकांच्या जिवलग मैत्रिणी आहेत

मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि प्रदीपचे एकत्र फोटोही डिलीट केले होते. त्यानंतर तिने खरेरा हे आडनावही हटवलं आहे. मानसी नाईकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना आता अभिनेत्री दीपाली सय्यदची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दीपाली सय्यद आणि मानसी नाईक या दोघीही एकमेकांच्या जिवलग मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा एकत्र फोटो शेअर करताना दिसतात. मानसीच्या लग्नापूर्वी दीपालीने तिचा पती प्रदीपची भेट घेतली होती. मानसीच्या लग्नावेळी दीपाली सय्यदने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती प्रदीपबद्दल बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…” पतीच्या वाढदिवशी मानसी नाईकच्या पोस्टने वेधले लक्ष

“मानसीने जेव्हा मला तिच्या नवऱ्याबद्दल सांगितले तेव्हा मी सर्वात आधी त्याचे बॅकग्राऊंड चेक केलं. प्रदीप कसा आहे त्याची माहिती काढली. एखाद्या मोठ्या बहिणीसारख्या मी त्याला बऱ्याच गोष्टी विचारल्या. अनेक गोष्टींची मी चौकशी केली होती. त्यावेळी मला प्रदीपमध्ये असा मुलगा दिसला जो सैरभर असणाऱ्या मानसीला कंट्रोल करु शकतो. त्याच्या येण्याने मानसी बदलले.

तिच्या आयुष्यातील आजारपण गायब झालं. मानसी नाईकला बघणारा एक प्रेक्षकवर्ग होता जो तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचा. प्रदीपच्या येण्याने त्यांची नजर बदलली. प्रदीप हा स्वतः एक स्पोर्टमन आहे. त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. प्रदीप हा तिला सांभाळू शकतो हे मला जाणवलं आहे. त्यामुळे मी या लग्नाला परवानगी दिली”, असे दीपाली सय्यदने म्हटले होते.

आणखी वाचा : “डोळ्यामध्ये पाणी होते…” मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. आता मानसी आणि प्रदीप यांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ते खरंच घटस्फोट घेणार का? त्यांच्या या निर्णयामागचं नक्की कारण काय? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 18:08 IST
Next Story
शरद पोंक्षेंनी थेट सावरकरांच्या कोठडीतून शेअर केला व्हिडीओ, अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना दिलं आव्हान, म्हणाले “अरे ए मूर्खा…”