Actress esha gupta got emotional for roger federer retirement rnv 99 | "याआधी कधीच.." रॉजर फेडररच्या निवृत्तीवर अभिनेत्री ईशा गुप्ताची भावून पोस्ट | Loksatta

“याआधी कधीच..” रॉजर फेडररच्या निवृत्तीवर अभिनेत्री ईशा गुप्ताची भावून पोस्ट

अभिनेत्री ईशा गुप्ताही खेळाची चाहती आहे. नुकत्याच एका बातमीने तिला अश्रू अनावर झाले.

“याआधी कधीच..” रॉजर फेडररच्या निवृत्तीवर अभिनेत्री ईशा गुप्ताची भावून पोस्ट

बॉलीवूड कलाकारांचं आणि खेळांचं नातं खूपच खास आहे. अनेक दिग्गज खेळाडूंवर बॉलिवूडमध्ये आतापर्यंत बायोपिक्स तयार झाले आहेत. अनेक सुप्रसिद्ध कलाकार कोणत्या ना कोणत्या खेळाचे चाहते आहेत. आपल्या आवडत्या संघाचा किंवा खेळाडूचा विजय ते अगदी उत्साहाने साजरा करत असतात. तसेच आपला आवडता खेळाडू निवृत्त झाल्यावर ते भावूनही होतात. अभिनेत्री ईशा गुप्ताही खेळाची चाहती आहे. नुकत्याच एका बातमीने तिला अश्रू अनावर झाले. रॉजर फेडररच्या निवृत्तीवर ईशा गुप्ताने भावूक होत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा : अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ चित्रपटाविरोधात शिक्षण मंत्र्यांचे थेट अनुराग ठाकुरांना पत्र, म्हणाले…

ईशा गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच एक व्होडिओ पोस्ट करत तिने रॉजर फेडररबद्दलचे तिचे प्रेम आणि आदर व्यक्त केला. हा व्हिडिओ पोस्ट करत ईशाने “रॉजर फेडररला इतकं भावूक झालेलं मी याआधी कधीच पाहिलेलं नाही,” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

ईशा गुप्ताने लिहिले, “आम्हाला टेनिसचा इतका सुंदर खेळ दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी लहानपणापासून तुझा खेळ बघत आले आहे. कारण मला टेनिस या खेळाइतकाच तू खेळाडू म्हणून आवडायचास आणि आजही तो आदर कायम आहे.”

आणखी वाचा : “अभिनयात ताकद नसली की…” बोल्ड फोटोंमुळे ईशा गुप्ता ट्रोल

अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत हार्ट इमोजी देत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये रॉजर फेडरर भावूक होताना दिसत आहे. त्याच्या शेजारी बसलेला राफेल नदालही रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून ईशाप्रमाणेच रॉजर फेडररचे असंख्य चाहतेही भावून झालेले पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मराठी सीरियलचा पॅटर्न आता आऊट ऑफ द बॉक्स होत चाललाय…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

संबंधित बातम्या

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
“दोन दिवस मी पुण्यात…” अचानक लाईव्ह येण्यामागे संकर्षण कऱ्हाडेने दिलं कारण
तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये जिंकलात, पण मग हिमालचमध्ये पराभव का झाला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण, म्हणाले “नशीबाने…”
‘समृद्धी’चं उद्घाटन करताना मोदी आम्हालाही टोमणे मारतील, पण…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!
“ज्यांच्याकडे मतदारसंघ सुद्धा स्वतःच्या हक्काचा नाही त्यांना…”; ‘भीक मागितली’ वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
“अश्लील हावभाव व अंगप्रदर्शन…” सध्याच्या लावणी प्रकाराबाबत ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांनी केलं होतं भाष्य
राणादा-पाठक बाईंपाठोपाठ ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, म्हणाली…