Marathi Actress On Trolls Over Marriage With Non Marathi Guy :‘अशी ही आशिकी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘उनाड’ अशा चित्रपटांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे. अभिनयाने चर्चेत राहणारी हेमल सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नवऱ्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हेमल गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी २०२५ मध्ये विवाहबंधनात अकडली. रौनक चोरडिया असं हेमलच्या नवऱ्याचं नाव आहे. तो मारवाडी असून, मूळचा कोल्हापूरचा आहे. रौनकशी लग्न झाल्यानंतर हेमलने अमराठी मुलाशी लग्न केल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या. यावर तिने विविध मुलाखतींमधून तिचे मत व्यक्तही केले आहे. अशातच आता तिने एक खास व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे.
हेमलने नवरा रौनकबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने अमराठी मुलाशी लग्न केल्याच्या प्रतिक्रियांना उत्तर दिले आहे. “Haters Will Still Comment अमराठी मुलाशी लग्न का केलं?”, असं शीर्षक देत तिने नवरा रौनकचे कौतुकदेखील केले आहे. त्यात हेमलने नवऱ्याबरोबरचे काही खास क्षण शेअर केले आहेत, ज्यात रौनक तिची काळजी घेताना, तिला जेवू घालताना आणि तिचे लाड करताना दिसत आहे
हेमल इंगळेने नवरा रौनकचं भरभरून केलं कौतुक
या व्हिडीओमध्ये हेमल नवऱ्याबद्दल म्हणते, “माझ्या आयुष्यातील सर्वांत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे ही व्यक्ती… जी दयाळू आहे, जी माझ्या आयुष्यात सुख-शांती घेऊन आली आहे, जी मला कायमच पाठिंबा देते, जी माझी काळजी घेते आणि जी मनापासून तुमचा आदर करते.” हेमलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या काही चाहत्यांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, तर रौनकनेही “खूप प्रेम” अशी कमेंट केली आहे.
लग्नानंतर हेमल तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. दोघे अनेकदा एकत्र परदेशांत फिरायला जात असतात. तसेच लाइव्ह कॉन्सर्ट अन् पार्ट्यांना जात असतात. याचे खास क्षण हेमल आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला नवऱ्याबरोबरचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
हेमल इंगळेने रौनकबरोबरचा शेअर केलेला व्हिडीओ
हेमल आणि रौनक यांच्या नात्याबद्दल थोडक्यात…
दरम्यान, हेमल आणि रौनक यांच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केले. रौनकचा स्वत:चा व्यवसाय आहे. शिक्षणासाठी काही वर्षे तो यूके मध्ये होता. २०१७ मध्ये रौनक भारतात आला आणि त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. मग दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
