scorecardresearch

‘मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते पण…’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकली हेमांगी कवी

हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते.

hemangi kavi

अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कधी तिचे कौतुक केले जाते तर कधी तिला खूप ट्रॉल केले जाते. आता पुन्हा एकदा हेमांगी चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वैयक्तिक प्रश्न विचारला म्हणून तिने एका नेटकऱ्याला परखड शब्दात उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : वैदेही परशुरामी दिसणार नव्या भूमिकेत, पहिल्यांदाच शेअर करणार ‘या’ अभिनेत्याबरोबर स्क्रीन

हेमांगीच्या एका पोस्टवर एका महिलेने ‘हेमू तू आई कधी होणार?’ अशी कमेंट केली होती. ही कमेंट वाचून हेमांगीचा राग अनावर झाला आणि या कमेंटवरुन हेमांगीने त्या महिलेचा चांगलाच समाचार घेतला. या कमेंटवर हेमांगीने स्पष्टच उत्तर दिले. कमेंटवर प्रतिक्रिया देताना हेमांगीनं म्हटलं की, “तुम्हाला नाही वाटत हा खूप पर्सनल प्रश्न आहे? आणि तो हा असा तुमच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीकडून येणं चुकीचं आहे. मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते. पण मला तुम्हाला आणि आपल्या सारख्या लोकांना कळवायचंय की, तू लग्न कधी करणार, तुमचा घटस्फोट झालाय का?, तू आई कधी होणार?, तुम्हाला किती मुलं आहेत?, तुमचा पगार किती आहे?, हे असले पर्सनल प्रश्न कधी कुणालाही विचारु नये. धन्यवाद!”

हेही वाचा : “आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तिची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणार व्हायरल होत आहे. हेमांगीने या आधीही अनेकदा नेटकऱ्यांना धारेवर धरत तिथल्या तिथे उत्तरं दिली आहेत. हेमांगीच्या या कमेंटवर अनेकांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-09-2022 at 17:21 IST
ताज्या बातम्या