scorecardresearch

“मी पहिल्यांदा शाहरूखला बघितलं अन्…” अभिनेत्री जुही चावलाने केला खुलासा

शाहरुख सध्या ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांवर काम करत आहे.

“मी पहिल्यांदा शाहरूखला बघितलं अन्…” अभिनेत्री जुही चावलाने केला खुलासा
bollywood pair

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेता, अभिनेत्री यांच्या जोड्या प्रसिद्ध होत्या. ‘आमिर जुही’, ‘अक्षय रविना’, ‘शाहरुख काजोल’ या जोड्यांना प्रेक्षकांनीदेखील डोक्यावर घेतलं. आज बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीला एकदा तरी किंग खान अर्थात शाहरुख खान बरोबर पडद्यावर रोमान्स करण्याची इच्छा असते. बॉलिवूडचा रोमँटिक हिरो म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते तो म्हणजे शाहरुख खान, आज जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. मात्र याच किंग खानला बघून अभिनेत्री जुही चावला त्याच्याबरोबर काम करण्यास कचरत होती. अभिनेत्रीने याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

आमिर खान बरोबर रुपेरी पडद्यावर झळकणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला, काही चित्रपटातच तिने आपली ओळख निर्माण केली. तिने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी पहिल्यांदा जेव्हा शाहरुखला बघितले तेव्हा मी काय बघितले असेल तर एक सावळा बारीक मुलगा ज्याचे केस मोठे होते. त्याला बघताच क्षणी माझ्या मनात विचार आला हा चित्रपटाचा हिरो आहे? हा आमिरसारखा आहे? पण तो पर्यंत मी चित्रपट स्वीकारला होता. मी हे मस्करीत म्हणत आहे पण हा कोणत्याच अंगाने आमिर खानसारखा दिसत नव्हता. मात्र काम केलं आहे शाहरुख खूप छान माणूस आहे’.

अजय देवगणला येतेय दृश्यमची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला….

शाहरुख जुहीने डर या चित्रपटात एकत्र काम केले होते. शाहरुखने यात नकारात्मक भूमिका साकारली होती. यानंतर ‘येस बॉस’, ‘डुप्लिकेट’, ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ या चित्रपटात एकत्र काम केले. दोघे आयपीलमधील ‘कोलकाता नाईट रायडर’ या संघाचे मालक होते. दोघे व्यावसायिक भागीदारदेखील आहेत. दोघांची मुलंदेखील एकाच वयोगटातील आहेत.

शाहरुख सध्या ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांवर काम करत आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे. झिरो’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. नुकताच तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. त्याचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या