अभिनेत्री काजल अग्रवालने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने केला ‘क्यूं’ ‘हो गया ना…’मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसह आणखी काही हिंदी चित्रपट केले. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान काजलने हिंदी इंडस्ट्री आणि साऊथ इंडस्ट्रीमधला फरक सांगितला.
हेही वाचा- अधिवेशनात पॉर्न बघतानाचा भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; अभिनेते प्रकाश राज ट्वीट करत म्हणाले…
बाळांतपणाच्या सुट्टीनंतर काजल पुन्हा कामावर परतली आहे. न्यूज १८ वरील एका शोमध्ये काजलला विचारण्यात आले होते की ती आता कोणत्या भाषेत काम करु इच्छिते. त्यावर काजल म्हणाली की, ‘मी बॉम्बेची मुलगी आहे, इथेच जन्मले आणि वाढले. मी हैदराबाद (तेलुगु) चित्रपट उद्योगात माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझे मुख्य ध्येय तामिळ आणि तेलुगू चित्रपट आहे. मी काही हिंदी चित्रपट केले आहेत पण हैदराबाद आणि चेन्नई मला घरासारखे वाटते आणि ते कधीही जाणार नाही.
हेही वाचा- “प्रेक्षकच आम्हाला वाईट…” सेन्सॉरशीप आणि बॉयकॉट ट्रेंडबद्दल सुधीर मिश्रा यांची प्रतिक्रिया
काजल म्हणाली की, “साऊथ इंडस्ट्री नक्कीच खूप स्वीकारार्ह आहे पण मला वाटते की कठोर परिश्रमांना कोणतीही सूट किंवा शॉर्टकट नाही आणि यशाचा कोणताही सोपा मार्ग नाही. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील फरकावरही काजलने भाष्य केले. ती म्हणाली, असे अनेक लोक आहेत ज्यांना हिंदीमध्ये आपले करिअर सुरू करायचे आहे कारण ती देशव्यापी मान्यताप्राप्त भाषा आहे. मात्र, साऊथ ही खूप फ्रेंडली इंडस्ट्री आहे. दक्षिणमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञ, अप्रतिम दिग्दर्शक आणि विलक्षण सामग्री आहे जीचा वापर करुन तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांमध्ये चित्रपट निर्मीती केली जाते.
हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढांना ‘आप’ खासदारानंतर प्रसिद्ध गायकाकडूनही शुभेच्छा; म्हणाला, “मी पहिलाच..”
अर्थातच हिंदी ही आपली मातृभाषा आहे. आपण हिंदी चित्रपट बघत मोठे झालो आहोत. पण मला साऊथ इंडस्ट्रीची इको-सिस्टम, नैतिकता, मूल्ये, शिस्त आवडते, ज्याचा मला हिंदी सिनेमात अभाव वाटतो.”