“देशातली सर्वात शक्तिशाली महिला”, कंगना रनौतनं स्वत:लाच दिली उपाधी!

कंगना रनौतनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरच्या स्टोरी पोस्टमध्ये स्वत:लाच देशातली सर्वात शक्तिशाली महिला अशी उपाधी देऊन घेतली आहे.

Kangana-Ranaut-1-1

गेल्या वर्षभरात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षाही तिने केलेल्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत आली आहे. विशेषत: तिच्या राजकीय विधानांमुळे तर कंगना अधिकच चर्चेत आणि वादात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘खलिस्तानी दहशतवाद’बाबत केलेल्या विधानावरून बराच वाद झाल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा कंगनानं केला आहे. धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचं कंगनानं सांगितल्यानंतर आता तिनं स्वत:लाच देशातली सर्वात शक्तिशाली महिला म्हणवून घेतलं आहे!

कंगना रनौतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रोफाईल स्टोरीजमध्ये एक पोस्ट केली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात तिच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. यासाठी एएनआयनं दिलेल्या एका वृत्ताचं ट्वीट देखील कंगनानं स्टोरीमध्ये दिलं आहे. या ट्वीटमध्ये “देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंगना रनौतच्या आगामी सर्व सोशल मीडिया पोस्ट सेन्सॉर करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे”, असं म्हटलं आहे.

कंगनानं या ट्वीटचा फोटो तिची इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट करत वर “देशातली सर्वात शक्तिशाली महिला” असा मेसेज लिहिला आहे. यापुढे एक मुकुटाचा इमोजी देखील तिने टाकला आहे.

नुकताच कंगनाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा सोशल मीडियाच्या माध्यामातून खुलासा केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुंबई हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे तिने यात म्हटलं आहे. तसेच कंगनाने अशा लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंगनाने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटोत ती तिच्या आई आणि बहिणीसोबत सुवर्णमंदिरात जात असल्याचे दिसत आहे. तर पुढील फोटो हे संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याप्रकरणी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress kangana ranaut instagram post most powerful woman in this country pmw

Next Story
दोन दशकांनंतर तारासिंह आणि सकिना येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘गदर २’च्या शूटिंगला सुरुवात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी