बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच कंगना रणौत. कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो अथवा राज्यातील राजकारण. एखाद्या विषयावर मत मांडण्याची संधी कंगना कधीही सोडत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गुरुवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला.

अंतिम टप्प्यात भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट झाल्याचे बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने यावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केले आहे.

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

शिंदे-फडणवीसांच्या शपथविधीनंतर रितेश देशमुखचे ट्विट चर्चेत, म्हणाला “आपले खूप…”

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने एकनाथ शिंदेचा एक फोटो शेअर केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे…, ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत… अभिनंदन सर, असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे.

दरम्यान गुरुवारी एकनाथ शिंदे हे दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाने शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. सायंकाळी साडेसात वाजता राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला शिवसनेच्या बंडखोर आमदारांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळेच शपथविधीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी थेट गोव्याला पोहोचले.

प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, ‘धर्मवीर’मधील खास फोटो शेअर करत म्हणाला…

शिवसेना नेते अनुपस्थित

नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला मावळते मुख्यमंत्री उपस्थित राहतात. परंतु, शिवसेनेतील बंडामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्याची उद्विग्नता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच होते. यामुळेच मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मावळत्या मंत्रिमंडळातील कोणीही यावेळी उपस्थित नव्हते.