कंगना रणौत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार? | actress kangana ranaut to meet cm eknath shinde at varsha banglow nrp 97 | Loksatta

कंगना रणौत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार?

एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे.

कंगना रणौत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार?
कंगना रणौत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायम ओळखली जाते. तसेच तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा मग राज्य आणि देशातील राजकीय विषय कंगना नेहमी त्यावर भाष्य करत असते. एखाद्या विषयावर मत मांडण्याची संधी कंगना कधीही सोडत नाही. आता कंगना रणौत ही लवकरच राजकारणात सक्रीय होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कंगना रणौत ही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे.

अनेक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कंगना रणौत ही उद्या शनिवारी (१ ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. उद्या ही भेट नेमकी किती वाजता होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : “कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कंगनाने आतापर्यंत अनेकदा शिवसेनेवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी तिने अनेकदा शिवसेनेवर टीका केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कंगना रणौतने त्यांचे अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा : कंगना रणौतकडून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर अभिनंदन, म्हणाली “रिक्षा चालवण्यापासून ते…”

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. यात तिने एकनाथ शिंदेचा एक फोटो शेअर केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले होते. यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे…, ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत… अभिनंदन सर, असे तिने यात म्हटले होते.

यानंतर आता कंगना रणौत ही एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. या भेटीत नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच कंगना राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : ‘ब्रह्मास्र’मधील ‘केसरिया’ गाणं पुन्हा होणार प्रदर्शित, अयान मुखर्जीने शेअर केला खास व्हिडीओ

संबंधित बातम्या

“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!
हार्दिक-अक्षयाच्या पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, फोटो आले समोर
Maharashtra News Live : अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात आज महत्त्वाची बैठक
“राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा…”, अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्र, ‘त्या’ मुलाखतीचाही केला उल्लेख!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप
स्वत:ची आत्महत्या करुन त्याला बुडवायचे होते २ कोटी अन् प्रेयसीसोबत थाटायचा होता संसार, पण…
पुणे: पीएच.डी. संशोधन केंद्रांतील गैरप्रकारांना चाप?
पुण्यात तडीपार गुंडांचा वावर; दोन गुन्हेगार अटकेत
Video : स्वप्निल जोशीच्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? लक्झरी गाडीची किंमत आहे…