कंगनाच्या बहुचर्चित ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘तेजस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटातील चित्रीकरणात व्यस्त आहे. कंगनाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘तेजस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

कंगनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने आगामी तेजस चित्रपटातील लूकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने पायलटचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने याला हटके कॅप्शनही दिले आहे.

“आम्ही तुमच्यासाठी एका प्रेरणादायी स्त्रीची कथा घेऊन आलो आहे. या महिलेने आकाशावर राज्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तेजस’ येत्या ५ ऑक्टोबर २०२२ ‘दसरा’च्या शुभमूहर्तावर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” असे कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या कॅप्शनद्वारे तिने ‘तेजस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या ५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरूवात झाली होती. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर सर्वेश मेवारा यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असणार आहे. यात सैन्य दलाच्या साहसाची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटात एका महिला वैमानिकेच्या साहसाची कहाणी दाखवण्यात आली आहे. २०१६ साली पहिल्यांदाच भारतीय विमान चालवण्यासाठी एका महिलेची नियुक्ती केली होती. तिच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

हेही वाचा : “बदाम खाल्ल्याने शहाणपण मिळत नाही तर…”, गायकाने भर शोमध्ये उडवली शिल्पा शेट्टीची खिल्ली

“गेल्या अनेक वर्षांपासून मला भारतीय सैन्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र अशा प्रकारचा कुठलाही चित्रपट अद्याप माझ्या वाट्याला आलेला नव्हता. परंतु ‘तेजस’ या चित्रपटामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही या चित्रपटावर जीव तोडून मेहनत करतोय आणि पंगा या चित्रपटाप्रमाणे तुम्हाला तेजस देखील आवडेल अशी मला खात्री आहे.” असे कंगना या चित्रपटाबद्दल म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress kangana ranaut upcoming film tejas to release on this date nrp

ताज्या बातम्या