बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिला खाण्याची आवड आहे, पण तरीही ती कसरत करून स्वतःला तंदुरुस्त ठेवते. ती कठोर परिश्रम करते असे तिच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले आहे आणि करीनाच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दलही सांगितले आहे.
अलीकडेच तिचा ट्रेनर महेश घानेकरने हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. फिटनेस ट्रेनर महेश घानेकर अनेकदा करीनाचे ट्रेनिंग व्हिडीओ पोस्ट करतो. आता त्याने अभिनेत्रीच्या फिटनेसबद्दल सांगितले आहे आणि करीनाने स्वतःला पुन्हा तंदुरुस्त कसे केले याबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, करीना आठवड्यातून किमान चार वेळा वेट ट्रेनिंग करते. ट्रेनर म्हणाला, “आम्ही एक तास, कधीकधी त्याहूनही जास्त वेळा ट्रेनिंग करतो आणि प्रत्येक सेशन १४-१५ व्हेरिएशन करतो. हे सर्व हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) आहे, परंतु ती कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. हेच मजेदार बनवते.”
महेश घानेकर पुढे म्हणाला की, करीना कपूरने वेट ट्रेनिंग, इंटरमिटंट फास्टिंग आणि हेल्दी डाएटमुळे वजन कमी केले आहे. “तिचे वजन ६७.५ किलोवरून सुमारे ६४ किलो झाले आहे. आम्ही आणखी २-३ किलो वजन कमी करण्याचे ध्येय ठेवत आहोत. करीनाने तिचे बायसेप्स आणि बॉडी इंचदेखील कमी केले आहेत. वेट ट्रेनिंग तिच्यासाठी खूप प्रभावी ठरत आहे आणि तिला तिची ताकद वाढत असल्याचे जाणवते.” प्रशिक्षक म्हणाला की, तो करीनाला खूप प्रेरित करतो, कारण त्याचा असा विश्वास आहे की प्रशिक्षणार्थीच्या मनालाही आव्हान देण्याची आवश्यकता आहे.
करीना कपूर नेहमीच तिच्या फिटनेसबद्दल मोकळेपणाने बोलत आली आहे. तिची योगा ट्रेनर अनुष्का परवानी हिने हे उघड केले की, अभिनेत्रीला तिच्या शरीराला काय हवे आहे आणि ती किती प्रयत्न करू शकते हे माहीत आहे. तिने ETA Iams ला सांगितले, “तिच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे; ती खूप जागरूक आहे. तिला नेहमीच योगा आवडतो आणि ती तिचे शरीर समजून घेते, म्हणून आम्हाला माहीत आहे की कधी थोडे अधिक प्रयत्न करायचे, कधी आपले व्यायाम बदलायचे किंवा असे दिवस येतात, जेव्हा आपल्याला फक्त श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करावे लागते.” गरोदरपणात करीनाचे वजन २० किलोने वाढले होते, या काळात तिला वेगवेगळे सल्ले मिळत होते. गरोदरपणातही तिने कसरत सुरू ठेवली होती.