सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कार्तिका नायरने लग्नगाठ बांधली आहे. तिने तिचा प्रियकर रोहित मेननशी १९ नोव्हेंबर रोजी लग्न केलं. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तिच्या लग्नाला अभिनेत्री रेवती, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, चिरंजीवी उपस्थित होते. कार्तिका ही एकेकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री राधा यांची मुलगी आहे. तिने केरळमधील त्रिवेंद्रम इथे लग्नगाठ बांधली. तिच्या राजेशाही लग्नाचा फोटो तिने शेअर केला आहे. तसेच लग्नातील उपस्थितांनी काही फोटो शेअर केले आहेत. 'Our Royal fairytale Begins', असं कॅप्शन देत कार्तिकाने फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. https://www.instagram.com/p/Cz1DCu6P4lr/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== कार्तिका ही अभिनेत्री राधा यांची मोठी मुलगी आहे. ती अभिनेत्री आहे, पण गेली ५-६ वर्षे ती इंडस्ट्रीपासून दूर आहे. कार्तिकाच्या लग्नाला चिरंजीवी, राधिका, सुहासिनी, रेवती, मेनका, जॅकी श्रॉफ आणि इतर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. कार्तिका व रोहितच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनाही आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.